Virat Kohli on Anushka : पत्नी अनुष्काच्या वाढदिवशी विराटचा भावपूर्ण संदेश 

Virat Kohli on Anushka : ‘तू नसतीस तर मी भरकटलो असतो,’ असं विराट अनुष्काला या संदेशात म्हणाला आहे 

125
Virat Kohli on Anushka : पत्नी अनुष्काच्या वाढदिवशी विराटचा भावपूर्ण संदेश 
Virat Kohli on Anushka : पत्नी अनुष्काच्या वाढदिवशी विराटचा भावपूर्ण संदेश 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपली पत्नी आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माच्या वाढदिवशी एक भावपूर्ण संदेश तिच्यासाठी लिहिला आहे. अनुष्कामुळे आपल्याला शक्ती मिळते आणि तिच्या आयुष्यात असण्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोहली आपल्या इन्स्टाग्राम संदेशात लिहितो, ‘तू आयुष्यात नसतीस, तर मी कुठेतरी हरवलो असतो. माझ्याबरोबर असण्यासाठी धन्यवाद!’  (Virat Kohli on Anushka)

(हेही वाचा- Devendra Fadnavis: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)

२०१७ मध्ये विराट आणि अनुष्का विवाहबद्ध झाले होते. दोघांना वामिका (vamika) आणि अकाय (Akaay) अशी दोन मुलं आहेत. विराट मैदानावर खेळत असताना अनेकदा अनुष्का प्रेक्षकांत बसून त्याला पाठिंबा देताना दिसते. विराट आणि अनुष्का यांचं लग्न हा क्रिकेट आणि बॉलिवूड या भारतीयांच्या दोन प्रेमांचा मिलाफ म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या प्रेमकहाणीची उदाहरणं दिली जातात. (Virat Kohli on Anushka)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खाननेही (Shah Rukh Khan) विराट हा बॉलिवूडचा जावई असून आपलं त्याच्यावर खूप प्रेम आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘अनुष्का आणि मी चित्रपटाचं एकत्र चित्रिकरण करत असताना दोघांची जवळीक वाढत होती. त्यामुळे विराटबरोबर चांगला वेळ घालवता आला. मला तेव्हापासून विराट खूप जवळचा आहे,’ असं शाहरुख विराटबद्दल बोलताना म्हणाला होता.  (Virat Kohli on Anushka)

(हेही वाचा- T20 World Cup Snub : रिंकू सिंगच्या गावकऱ्यांनी आणून ठेवले होते फटाके आणि मिठाई )

विराटने अलीकडेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आपल्या मुलाच्या जन्मासाठी क्रिकेटमधून रजा घेतली होती. या कालावधीत इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांत तो खेळला नाही. पण, आयपीएलमध्ये तो भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आणि ११ सामन्यांत ५०० धावा करत ऑरेंज कॅपही त्याने नावावर केली आहे. (Virat Kohli on Anushka)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.