कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून उलगडला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट

119

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहयोगाने आणि कलांगण प्रस्तुत कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित कलाकृतीचे सादरीकरण दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास पाध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि वर्षा भावे उपस्थित होत्या.

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक प्रगतीचे काळा घोडा महोत्सवात प्रदर्शन!)

या कलाकृतीचे लेखक शिवदास मसगे यांनी वीर सावरकरांचे विचार व कार्य समोर आले पाहिजे जेणेकरून लहान मुलांना त्यांची पूर्ण ओळख होईल याची विशेष काळजी घेतली. तसेच याचे दिग्दर्शन गणपत मसगे आणि सादरीकरण कृष्णा मसगे यांनी केले आहे. कलाकृतीचे लिखाण झाल्यावर सर्वाधिक मेहनत बाहुल्या बनवताना घेण्यात आली. अथक प्रयत्न आणि जिद्द मनात ठेऊन छाया आणि कळसुत्री बाहुल्या यांचे मिश्रण करून कृष्णा मसगे यांनी बाहुल्या बनवल्या.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत सखाराम मसगे यांनी या कार्यक्रमात नेपथ्य निर्माण केल्यामुळे या संपूर्ण कलाकृतीला आणखी शोभा आली. या कार्यक्रमाचा पहिला शो दिल्ली येथे रविंद्र भवन संगीत नाटक अकादमी येथे सादर करण्यात आला. यानंतर जिल्हा स्तरावर या कलाकृतीचे कार्यक्रम करण्यात आले. संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण सुद्धा यात सहभागी व्हावे व आपल्या कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यामातून वीरांची जीवन कहाणी लोकांसमोर मांडावी अशी इच्छा मनात निर्माण झाली आणि त्यानंतर यासाठीचे प्रयत्न सुरू केले. याचवेळी ‘धगधगते यज्ञकुंड’ हे पुस्तक वाचनात आले या पुस्तकाचा एवढा प्रभाव झाला की एक निश्चय केला आपण वीर सावरकरांवरच कार्यक्रम केला पाहिजे यातून या कलाकृतीची निर्मिती झाली, अशी प्रतिक्रिया कृष्णा मसगे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.