लिंगाडे नशीबाचे धनी; अमरावतीच्या जागेवर पराभूत का झालो याचं आत्मचिंतन करणार – चंद्रशेखर बावनकुळे

142

अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत (Amravati Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) विजयी झाले आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे असलेले रणजित पाटील (Ranjit Patil) यांना धीरज लिंगाडे यांनी पराभूत केलं आणि यामुळे त्यांची हॅट्ट्रीक हुकली. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना लिंगाडे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, माझी आघाडी कमी करण्यासाठी खोक्यांची ऑफर दिली होती. यालाच प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिलं आहे. तसंच अमरावतीच्या जागेवर पराभूत का झालो? याचं आत्मचिंतन करणार आणि पुढे जाणार असल्याचं बावनकुळे म्हणाले.

नक्की काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

रविवारी प्रसार माध्यमांसोबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘खरंतर धीरज लिंगाडे हे नशीबाचे धनी आहेत. मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाहीये. आम्ही याचं आत्मचिंतन करतोय. खरंतर आम्ही ही निवडणूक हरायला नव्हती पाहिजे. पण ती कुठल्या कारणानं नेमकी गेलीय याचा आम्ही अभ्यास करतोय. लिंगाड यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणात हार-जीत मान्य असते. आम्ही हार मान्य केलीय. पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं काय आमचं चुकलंय याचं आम्ही आत्मचिंतन करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत.’

(हेही वाचा – BMC Budget 2023-24: चहलांची निष्ठा शिंदे-फडणवीसांवरच: तब्बल सहा वेळा अर्थसंकल्पात नावाचा उल्लेख)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.