घरपोच LPG गॅस सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे मागितले जातायत? अशी करा तक्रार

127

वाढत्या महागाईने सामान्य लोकांचे कबंरडे मोडले आहे. अशातच एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी घरोघरी येणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून देखील ठरलेल्या रक्कमेपेक्षा २० ते ३० रूपये अधिकचे मागितले जातात. मात्र गॅस सिलिंडर घेताना मिळणाऱ्या पावतीवर स्पष्टपणे कोणतेही अधिकचे रूपये देऊ नका, असे आवाहन ग्राहकांना केलेले असते. असे असतानाही ग्राहकांकडून एजन्सीचा कर्मचारी जास्त पैसे स्वीकारतो, यामुळे सर्वसामान्यांची एकप्रकारे पिळवणूकच होते. एवढेच नाही तर गृहिणीचे बजेट देखील कोलमडते. अशावेळीस ग्राहकांनी याबाबत तक्रार करून दाद मागणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – तुम्हाला माहिती आहे का? LPG गॅस कनेक्शन सोबत मिळतो इतक्या लाखांचा विमा)

वाढत्या महागाईदरम्यान, घरगुती सिलिंडरचे दर मुंबईत सरासरी १ हजार ५० रुपये इतके असून यावर आणखी घरपोच सिलिंडर पोहोचवण्याचे शुल्क २० ते २५ रुपये आकारले जाते. त्यामुळे सिलिंडर विकत घेताना अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने ग्राहकांची एकप्रकारे लूटच केली जाते. त्यामुळे अतिरिक्त पैसे मागत असल्यास तक्रार करणं आवश्यक आहे. मुंबईत भारत गॅस, इंडेन गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांद्वारे गॅस सेवा पुरवली जाते. त्यातही भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. तर इंडेन गॅसची ग्राहक संख्या त्यामानाने कमी आहे. तुमच्याकडेही या कंपन्यांपैकी कोणताही गॅस सिलिंडर घरी येत असेल आणि अधिकचे पैसे घेतले जात असती तर अशी करा तक्रार…

घरोघरी सिलिंडर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार असला तरी काही कर्मचारी सिलिंडरच्या ठरलेल्या रकमेशिवाय अधिकचे पैसे घेताना दिसतात. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत.

  • भारत गॅस – १८००२२४३४४
  • इंडेन गॅस – १८००२३३३५५५
  • हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी) – १८००२३३३५५५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.