OYO Layoffs: दुसऱ्यांदा कर्मचारी कपात, 600 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

110

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या दिग्गज कंपन्या सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. या यादीत ऑनलाइन हॉटेल बुकिंग कंपनी OYO चे नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे. OYO आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीने शनिवारी एका निवेदनात म्हटले की, कंपनी तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील 600 कर्मचाऱ्यांना नारळ देणार असून त्याच्या व्यवस्थापन विभागात सुमारे 250 लोकांची नियुक्ती करणार आहे. तर कंपनी आपल्या 3 हजार 700 कर्मचार्‍यांपैकी 10 टक्के कर्चाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार आहे.

(हेही वाचा – घरपोच LPG गॅस सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे मागितले जातायत? अशी करा तक्रार)

हॉस्पिटॅलिटी अंतर्गत असणाऱ्या OYO कंपनीने शनिवारी (3 डिसेंबर) कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. यावेळी कंपनीने असे सांगितले 3,700 कर्मचाऱ्यांपैकी 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. OYO ने आपल्या संस्थेची रचना बदलण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. याबाबत OYO चे संस्थापक आणि समूह सीईओ रितेश अग्रवाल यांनी असे सांगितले की, आम्ही ज्या लोकांना नोकरीवरून कमी करत आहोत त्यांना चांगली नोकरी मिळावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. OYO टीमचा प्रत्येक सदस्य आणि मी या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कायम सक्रियपणे काम करणार आहोत.

दुसऱ्यांदा कर्मचारी कपात

गेल्या दोन वर्षांत OYO ने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीचा व्यवसाय दीर्घकाळ टिकावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, हॉटेल एग्रीगेटर कंपनी OYO पुढील वर्षी IPO आणण्याच्या तयारीत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.