डिजिटल स्ट्राईक: 232 चिनी अॅप्सवर भारताने घातली बंदी

137

केंद्र सरकारने पुन्हा एकदा चिनी मोबाईल अॅप्सवर मोठी कारवाई केली आहे. सरकारने 200 हून अधिक चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅप्सच्या मदतीने चीनकडून भारतात बेकायदेशीर कर्ज, सट्टेबाजी आणि जुगाराचा व्यवसाय चालवला जात होता. यामुळे भारत सरकारने कठोर पाऊल उचलत चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. याआधीही भारत सरकारने अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

232 चिनी अॅप्सवर बंदी

भारत सरकारच्या इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार, 232 चिनी अॅप्स ब्लाॅक करण्याचे आदेश जारी केले आहेत. बेटिंग, जुगार आणि मनी लाॅंड्रिंगसारख्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या 138 अॅप्सना ब्लाॅक करण्याचा आदेश 4 फेब्रुवारीलाच जारी करण्यात आला. यासोबतच अनधिकृत प्रकारे कर्ज देणा-या 94 अॅप्स ब्लाॅक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मधल्या काळात बेकायदेशीर कर्जसेवा देणा-या अॅपमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते, कर्ज आणि त्यावरील व्याज फेडणे ग्राहकांसाठी कठीण झाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.

( हेही वाचा: भुकंपाने हादरलं तुर्की; 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप, मोठी जीवितहानी झाल्याची भीती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.