7.9 रिश्टर स्केलच्या भुकंपानं हादरलं तुर्की; 34 इमारती पडल्या, मोठी जीवितहानी झाल्याची भीती

161

तुर्कीत 7.9 तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून प्रचंड जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण तुर्कीत असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय सिरीया, लेबनान, सिपरस, जाॅर्डन, इजिप्त आणि इस्त्राइललादेखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

तुर्कस्तानच्या नुरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिअॅक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी मोजली गेली आहे. हा भूंकप दक्षिण तुर्कीमध्ये झाला. अनेक इमारती आणि अपार्टमेंट कोसळल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, मालमत्तेचीही हानी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:17 वाजता सुमारे 17.9 किमी खोलीवर झाला.  सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 ( हेही वाचा: ‘या’ 10 ठरावांनी वाजले 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप )

 

स्थानिक वेळेनुसार, तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. तुर्कस्तानच्या गॅझियाटेपजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.