कोविड टेंडर घोटाळा; जाणून घ्या नक्की कोण आहे यासीर फर्निचरवाला

ईडीच्या तपासात यासीर फर्निचरवाला यांचे नाव समोर येताच ईडीचे एक पथक यासीर फर्निचरवाला यांच्या वरळी येथील फ्लॅटवर गेले.

189
कोविड टेंडर घोटाळा; जाणून घ्या नक्की कोण आहे यासीर फर्निचरवाला

कोविड टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीच्या तपासात यासिर फर्निचरवाला हे नाव समोर आले आहे. ईडीचे अधिकारी फर्निचरवाला याच्या वरळी येथील घरी छापेमारीसाठी गेले होते परंतु फर्निचरवाला हे कुटुंबियांसह मुंबईच्या बाहेर गेल्यामुळे ईडीकडून फर्निचरवाला यांचे घर तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले आहे.

(हेही वाचा – कोविड टेंडर घोटाळा : ‘पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा’ – उद्धव ठाकरे)

यासिर फर्निचरवाला हे महानगर पालिकेचे परवानाधारक कंत्राटदार असून महानगर पालिकेचे बहुतांश काम फर्निचरवाला यांना दिले जाते. तसेच फर्निचरवाला यांचे महानगर पालिकेच्या अधिकारी यांच्यासोबत चांगले आणि आर्थिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

ईडीच्या तपासात यासीर फर्निचरवाला यांचे नाव समोर येताच ईडीचे एक पथक यासिर फर्निचरवाला यांच्या वरळी येथील फ्लॅटवर गेले होते, परंतु फर्निचरवाला हे कुटुंबियांसह परदेशात गेले आहेत, त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद असल्याने ईडीच्या अधिकारी यांनी फर्निचरवाला परदेशातुन येईपर्यत हा फ्लॅट तात्पुरता स्वरूपात सील केला आहे. फर्निचरवाला हे घरी आल्यावर ईडीकडून फर्निचरवाला यांच्या घरी सर्च ऑपरेशन राबविण्यात येणार असून फर्निचरवाला यांचा जाबजबाब नोंदविला जाईल असे सूत्रांनी सांगितले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.