Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांची चारही शंकराचार्यांना विशेष विनंती; म्हणाले…

Yogi Adityanath : राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे, असे वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी शंकराचार्यांना आवाहन केले आहे.

318
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांची चारही शंकराचार्यांना विशेष विनंती; म्हणाले...
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांची चारही शंकराचार्यांना विशेष विनंती; म्हणाले...

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी (Shankaracharya) सहभागी झाले पाहिजे. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. त्यांनी निश्‍चित या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या लतादीदींच्या आठवणी; शेअर केला ‘हा’ व्हिडिओ)

राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे, असे वातावरण तयार झाले आहे. त्यावर शंकराचार्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमचा कोणताही विरोध नाही, असेही सांगितले आहे. मात्र ज्योतिष (Jyotish Peeth), द्वारका (dwarka peeth), पुरी (Govardhan Math) आणि श्रृंगेरी (sringeri peeth) या चारही पीठांच्या शंकराचार्यांनी विविध कारणांमुळे श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाणार नसल्याचे कळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी हे आवाहन केले आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Pune: विमानसेवेला सलग तिसऱ्या दिवशी फटका, ढगाळ हवामानामुळे १२ विमाने रद्द)

योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असीन, देशाचा सामान्य नागरिक असेल अथवा शंकराचार्य असतील, कुणीही रामापेक्षा मोठे नाही. प्रभु रामचंद्रांपेक्षा मोठे कुणीही नाही. प्रत्येक माणसाला स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी (Shankaracharya) त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नये. (Yogi Adityanath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.