Sunita Williams 3rd Mission: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित, अमेरिकेची अवकाश संस्था नासाने सांगितले कारण ? जाणून घ्या

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, केनेडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टार लाइनर हे नवे अंतराळयान सुनीता यांना घेऊन सकाळी आठच्या सुमारास उड्डाण करणार होते.

102
Sunita Williams 3rd Mission: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित, अमेरिकेची अवकाश संस्था नासाने सांगितले कारण ? जाणून घ्या

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या मंगळवारी, (७ मे) तिसऱ्यांदा अवकाशा झेप घेणार होत्या, मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांची अवकाश भरारी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. (Sunita Williams 3rd Mission)

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, केनेडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टार लाइनर हे नवे अंतराळयान सुनीता यांना घेऊन सकाळी आठच्या सुमारास उड्डाण करणार होते. सुनीता आपल्यासोबत भवगदगीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत घेऊन जाणार होत्या, पण सध्या त्यांना तिसऱ्यांदा अवकाशात जाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. नेमका काय तांत्रिक दोष निर्माण झाला होता, हे कळू शकलेलं नाही. नासाने यासंदर्भातील माहिती त्यांच्या अधिकृत ‘X’वर पोस्टद्वारे प्रसिद्ध केली आहे. (Sunita Williams 3rd Mission)


(हेही वाचा – IPL 2024, MI bt SRH : सूर्यकुमार नावाच्या वादळाने हैद्राबादला हादरवलं)

मोहीम पुढे का ढकलली?
सुनीता या अवकाश झेप घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. त्या तिसऱ्यांदा अवकाशात झेपावणार होत्या, पण अंतराळयान उड्डाण करण्याच्या फक्त ९० मिनिटांआधी ही मोहीम थांबवण्यात आली, अमेरिकेची अवकाश संस्था नासाने यांसदर्भात सांगितले की, अंतराळयानातील ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व व्यवस्थित काम करत नव्हता त्यामुळे त्यांची मोहीम पुढे न नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.