Gadchiroli Naxalites: गडचिरोलीत नक्षली घातपाताचा डाव उधळला, विशेष नक्षलविरोधी पथकाची कारवाई

73
Gadchiroli Naxalites: गडचिरोलीत नक्षली घातपाताचा डाव उधळला, विशेष नक्षलविरोधी पथकाची कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. (Gadchiroli Naxalites)

नक्षलग्रस्त टिपागड पहाडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. लोकसभा निवडणुकीदरम्यान आयईडी हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माइन्स जमिनीत पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी डोंगरावर शोधमोहीम राबवली. या वेळी स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले ६ प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले ३ क्लेमोर पाइप्स देखील सापडले. उर्वरित ३ क्लेमोर पाइप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. (Gadchiroli Naxalites)

(हेही वाचा – Poonch Terror Attack : पुंछ दहशदवादी हल्ल्यातील २ दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रसिद्ध )

साहित्य जागीच जळून खाक झाले
पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकूण ९ आयईडी आणि ३ क्लेमोर पाइप्स बीडीडीएस पथकाच्या साहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व टीम जवळच्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस अधीक्षकांची माहिती
सोमवारी, (६ मे) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलविरोधी पथक सी ६०, केंद्रीय राखीव दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जवानांना स्फोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर, ३ क्लेमोर पाईप, गन पावडर, औषधे व इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने ९ आयईडी व ३ क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केले. सर्व टीम जवळच्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.