Lok Sabha Election 2024: मोदी आणि ममता यांचा ॲनिमेटेड डान्स व्हायरल, पंतप्रधानांनी केले कौतुक, मात्र मुख्यमंत्र्यांची नाराजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

220
Lok Sabha Election 2024: मोदी आणि ममता यांचा ॲनिमेटेड डान्स व्हायरल, पंतप्रधानांनी केले कौतुक, मात्र मुख्यमंत्र्यांची नाराजी

देशभरात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये ४ टप्प्यांत मतदान झाले असून अनेक राज्यांमध्ये अद्याप मतदान व्हायचे आहे. २० मे रोजी ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी मतदान होणार आहे. अशावेळी मतदारांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते विविध राज्यांना भेटी देत आहेत.

विरोधकांचे एकमेकांविरुद्ध वक्तृत्व सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक व्हिडियो आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते सर्व राजकीय पोस्टर्स आणि व्हिडिओंचा आनंद घेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – दादरमधील Mcdonald मध्ये बॉम्बस्फोट होणार ? मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला फोन )

सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जींचा अॅनिमेटेड डान्स सुरू आहे. हा व्हिडिओ पाहून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ बनवणाऱ्या सोशल मीडिया युझरवर ममता बॅनर्जी यांनी टीका केली. याबाबत ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलीस व्हिडिओ बनविणाऱ्या व्यक्तीला अटक करतील, असा इशारा दिल्यानंतर या व्हिडियोसंदर्भात त्यांच्या अधिकृत ‘X’या सोशल मीडिया माध्यमावर केलेले ट्विटही काढून टाकण्यात आले आहे.

पोलिसांनी अटकेची माहिती केली ट्विट
कोलकाता पोलिसांच्या अधिकृत ‘X’ खात्याने सोमवारी, (६ मे) एका सोशल मीडिया वापरकर्त्याला सार्वजनिकरित्या त्याची ओळख उघड करण्यास सांगितले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव आणि पत्ता देण्यास सांगितले. वापरकर्त्याचा गुन्हा हा होता की, त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मिम व्हिडिओ शेअर केला होता. जर मागितलेली माहिती उघड केली गेली नाही, तर तुम्ही सीआरपीसीच्या कलम ४२अंतर्गत कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार असाल, असेही पोलिसांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पंतप्रधानांनी व्हिडिओ ट्विटरवर री-पोस्ट केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलीकडेच, पंतप्रधान मोदींचा चेहरा असलेला एक एनिमेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये ते नाचताना दिसत आहेत. हा व्हिडियो स्वतः पंतप्रधान मोदी यांनी शेअर केला होता. आपल्या अधिकृत हँडलवरून पोस्ट री-पोस्ट करताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले, “तुमच्या सर्वांप्रमाणेच मलादेखील स्वतःला नृत्य करताना पाहून आनंद झाला. निवडणुकांच्या हंगामातील अशी सर्जनशीलता खरोखरच उत्साहवर्धक आहे.” (Social Media Memes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.