दादरमधील Mcdonald मध्ये बॉम्बस्फोट होणार ? मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला फोन

197
दादरमधील Mcdonald मध्ये बॉम्बस्फोट होणार ? मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला फोन
दादरमधील Mcdonald मध्ये बॉम्बस्फोट होणार ? मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला फोन

दादरमधील (DADAR) मॅकडोनाल्डमध्ये (Mcdonald) स्फोट होणार असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे.धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने कॉल करून दादर परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तो बेस्ट बस क्रमांक ३५१ मध्ये प्रवास करत होता त्यावेळी दोन व्यक्तींचे संभाषण ऐकले ज्यामध्ये ते मॅकडोनाल्ड उडवण्याबाबत बोलत होते. (Mcdonald)

(हेही वाचा –Patanjali कंपनीच्या अडचणीत वाढ! सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई)

शनिवारी(१८ मे) रात्री कॉलरने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली.पोलिसांनी सांगितले की, एका व्यक्तीने कॉल करून सांगितले की, बस मधून प्रवास करत असताना दोन व्यक्ती आपापसात बोलत होते.ते दोघे जण दादर परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट करण्याबाबत बोलत होते.त्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. (Mcdonald)

(हेही वाचा –सर्वोच्च न्यायालयाचा Manipur UPSC परीक्षार्थींना मोठा दिलासा!)

या कॉलनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. रात्रभर पोलीस बॉम्ब शोधण्यात व्यस्त होते. सखोल तपास करूनही पोलिसांना अद्याप एकही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकालाही सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. मुंबई पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास सर्वांनी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Mcdonald)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.