Poonch Terror Attack : पुंछ दहशदवादी हल्ल्यातील २ दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रसिद्ध 

सुरक्षा दलांनी अबू हमजा आणि इतर हल्लेखोरांचा शोध सुरू ठेवला आहे. पुंछमधील ज्या भागात हा हल्ला झाला तो भाग लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी वेढला आहे.

101
Poonch Terror Attack : पुंछ दहशदवादी हल्ल्यातील २ दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रसिद्ध 

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी (४ मे २०२४) भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) जवानांना लक्ष करून दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला. या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला तर चार जण जखमी झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी सखोल शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) विदेशी दहशतवादी अबू हमजाचा (Abu Hamza) हात असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी याआधीच अबू हमजावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचवेळी हा हल्ला करणाऱ्या आणखी दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रे (Drawings of terrorists) जारी करण्यात आली आहेत. या दोघांची अचूक माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस प्रशासनाने जाहीर केले आहे. (Poonch Terror Attack)

(हेही वाचा – Madha LS Constituency : माढा मतदार संघात महायुतीचे पारडे जड)

रविवारी सुरक्षा दलांनी अबू हमजा आणि इतर हल्लेखोरांचा शोध सुरू ठेवला. पुंछमधील ज्या भागात हा हल्ला झाला तो भाग लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी वेढला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडो तैनात करण्यात आले आहेत. जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून सर्व वाहनांची झडती घेतली जात आहे. (Poonch Terror Attack)

हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, तर चौथ्या सैनिकाला उपचारासाठी उधमपूरला हलविण्यात आले आहे. अबू हमजा हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित आहे. त्याच्या अटकेवर प्रशासनाकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हमजा आणि त्याचे साथीदार पुंछ आणि राजौरीच्या जंगलात सक्रिय असल्याचे समजते. अबू हमजा हा सरकारी कर्मचारी मोहम्मद रज्जाकच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचेही मानले जाते, २२ एप्रिल रोजी राजौरी येथे हत्या करण्यात आली होती. (Poonch Terror Attack)

(हेही वाचा – ‘४ जून ही बीजेडी सरकारची एक्स्पायरी डेट’; निवडणुकीनंतर भाजपा डबल इंजिन सरकार बनवणार – PM Narendra Modi)

आयएएफवर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या दोघांची अचूक माहिती देणाऱ्यांना प्रशासनाकडून २० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सैनिकांवर झालेल्या हल्ल्यात एके असॉल्ट रायफल्स आणि स्टीलच्या गोळ्यांसह अमेरिकन बनावटीच्या M4 कार्बाइनचा वापर करण्यात आला. जम्मू एडीजीपीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.  (Poonch Terror Attack)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.