Pune: विमानसेवेला सलग तिसऱ्या दिवशी फटका, ढगाळ हवामानामुळे १२ विमाने रद्द

108
Pune: विमानसेवेला सलग तिसऱ्या दिवशी फटका, ढगाळ हवामानामुळे १२ विमाने रद्द
Pune: विमानसेवेला सलग तिसऱ्या दिवशी फटका, ढगाळ हवामानामुळे १२ विमाने रद्द

ढगाळ हवामानामुळे विमान प्रवासाला सलग तिसऱ्या दिवशी फटका बसला आहे. पुण्याहून (Pune) येणारी आणि जाणारी एकूण १२ विमाने मंगळवारी (ता. १६) रद्द करण्यात आली आहेत.

रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये प्रामुख्याने दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीवरून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि जाणारी अशी ५० विमाने रद्द झाली आहेत, तर अनेक विमानांना उशीर झाला आहे. यामध्ये मंगळवारी पुण्यात येणारी ७ आणि पुण्यातून जाणारी ५ अशा बारा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

(हेही वाचा – PM Modi Vadnagar: पीएम नरेंद्र मोदींच्या वडनगर गावात उत्खननातून सापडले पुरातन अवशेष, वाचा सविस्तर … )

प्रवाशांना भुर्दंड
त्यामध्ये दिल्लीच्या ६ विमानांचा समावेश आहे, तर चंडीगड, गुवाहाटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. विमाने रद्द होण्याबरोबरच अनेक विमानांना उशीरदेखील झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.