PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या लतादीदींच्या आठवणी; शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेची तयारी चालू आहे. देशभरातील भाविक आपापल्या परीने त्यासाठी योगदान देत आहेत. अशा वातावरणात PM Narendra Modi यांना लतादीदी यांची आठवण आली आहे.

158
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या लतादीदींच्या आठवणी; शेअर केला 'हा' व्हिडिओ
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या लतादीदींच्या आठवणी; शेअर केला 'हा' व्हिडिओ

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लता मंगेशकर यांची कमी जाणवली आहे. लता दीदींनी (Lata Mangeshkar) गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : हेमा मालिनी रामायणावर आधारित नाटक सादर करणार)

श्लोकाचा व्हिडिओ शेअर 

22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेची तयारी चालू आहे. देशभरातील भाविक आपापल्या परीने त्यासाठी योगदान देत आहेत. अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लतादीदी यांची आठवण आली आहे. गानकोकीळा लता दीदी (Lata Mangeshkar) यांनी गायलेल्या श्लोकाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

अनेकांची कमी जाणवत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या X अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये पंतप्रधान लिहितात, ”भारतियांना 22 जानेवारी 2024 या दिवसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आपल्याला अनेकांची कमी जाणवत आहे. यातीलच एक म्हणजे लतादीदी. लता दीदींनी गायलेल्या एका श्लोकाचा व्हिडिओ शेअर करत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार लता दीदींनी रेकॉर्ड केलेला हा शेवटचा श्लोक होता.”

(हेही वाचा – Show Cause to Indigo : प्रवाशांनी रनवेवर जेवण घेतल्यानंतर इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस)

नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचे बहीण-भावाचे नाते

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लता मंगेशकर यांचे बहीण-भावाचे, असे विशेष नाते होते. नरेंद्र मोदींसाठी लता दीदींनी सामाजिक खात्यांवर अनेकदा खास पोस्ट शेअर केल्या आहेत. लता मंगेशकरांच्या निधनानंतर आलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशीही पंतप्रधानांना लतादीदींची आठवण आली होती.

हृदय में श्रीराम है ।

आतापर्यंत अनेकांना राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (Rammandir Pran Pratishtha) सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir) सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींचा देखील समावेश आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त एक विशेष गाणं रचलं आहे. सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी हे गाणं गायलं आहे. हृदय में श्रीराम है । हर कंठ में श्रीराम है ।।, असे या गाण्याचे बोल आहेत. संदीप खरे यांनी हे गीत लिहिलं आहे. (Ram Mandir Inauguration)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.