मिलिंद देवरानंतर Congress ला अजून एक धक्का बसणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

321

मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसचे (Congress) अजून एक ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि त्यांची कन्या, आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्यासह काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात होत आहे.

पाटील-शिंदे भेट

सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर शंभरावे (१००) नाट्यसंमेलन होणार असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे शिंदे यांची भेट घेणार आहेत. ही भेट शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी नाट्यसंमेलन निमंत्रण देण्याच्या निमित्ताने होत असली तरी यामुळे शिंदे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. (Congress)

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)

पक्षप्रवेशाची ऑफर दिली

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडे प्रभावी उमेदवार नसल्याने शिंदे यांना आपल्या कन्येसह पक्षप्रवेशाची ऑफर दिली असल्याचे बोलले जात आहे. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनीही त्याची कबुली दिली आहे. भाजपकडे प्रभावी उमेदवार नाही तसा प्रणिती शिंदे यांच्याकडे प्रभावी पक्ष नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिंदे परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश? 

परवा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister Narendra Modi) सोलापूर (solapur) दौऱ्यावर येणार असून मोदी पंतप्रधान आवास योजनेतील ९०,००० लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप आणि १७०० कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन होणार आहे. यावेळी मोदी यांची जाहीर सभा होणार असून पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिंदे परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.