Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष

482
  • नित्यानेद भिसे

अयोध्येत अखिल हिंदू धर्मीयांसाठी अभिमान वाटावे असे भव्य दिव्य श्रीराम मंदिर (Ayodhya Ram Mandir) अयोध्येत उभारण्यात आले आहे. तब्बल ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या मंदिराच्या पुनर्निमाणाचा हा ऐतिहासिक क्षण आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्रत्येक राम भक्त या आतुरतेने वाट पाहत असलेल्या या मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) ५०० वर्षांचा संघर्षाचा काळ कसा होता, जाणून घेऊया…

(हेही वाचा Ayodhya: राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी कधी खुले होणार? जाणून घ्या …)

  • १५२८ – बाबरने अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर पाडून मशीद बांधली.
  • १८५३ – पहिल्यांदा अयोध्येत उसळला प्रचंड जातीय हिंसाचार.
  • १८५९ – ब्रिटिश सरकारकडून वादग्रस्त जागेभोवती बांधले कुंपण.
  • १८५९ – मुस्लिमांना इमारतीत, हिंदूंना कुंपणाबाहेर पूजेची परवानगी.
  • १८८५ – फैजाबाद जिल्हा न्यायालयात राम चबुतऱ्यावर श्रीराम मंदिर बांधण्यासाठी याचिका फेटाळली.
  • १९४९ – मशिदीच्या आत सापडली भगवान श्रीरामाची मूर्ती.
  • १९५० – रामललाची पूजा करण्याची परवानगी मिळण्यासाठी याचिका दाखल.
  • १९५९ – रामजन्मभूमीचा ताबा मिळावा म्हणून तिसरा अर्ज दाखल.
  • १९६१ – यूपी सुन्नी वक्फ बोर्डाचा जमिनीचा हक्क मिळावा म्हणून अर्ज.
  • १९६१ – सुन्नी वक्फ बोर्डाकडून श्रीरामाची मूर्ती हटवण्याची मागणी.
  • १९८४ – विश्व हिंदू परिषदेकडून श्रीराम मंदिर उभारण्यासाठी देशव्यापी आंदोलन.
  • १९८६ – जिल्हा न्यायाधीशाकडून हिंदूंना मशिदीचे कुलूप उघडून दर्शन घेण्याची परवानगी.
  • १९८९ – विहिंपने वादग्रस्त जमिनीजवळ राम मंदिराच्या पायाभरणीसाठी ठेवली पहिली शिळा.
  • १९९० – लालकृष्ण अडवाणींनी राम मंदिराच्या उभारणीसाठी काढली रथयात्रा
  • १९९२ – हिंदू संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांकडून बाबरी मशिदीचा ढाचा उद्धवस्त.
  • १९९२ – बाबरी पडल्यानंतर देशभरात उसळल्या जातीय दंगली.
  • २००२ – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू.
  • २००३ – एएसआयने मशिदीखाली राम मंदिर असल्याचे सांगितले, मात्र मुस्लिम पक्षाचा विरोध.
  • २०१० – अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेविषयी महत्वाचा निर्णय.
  • २०१० – वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, रामलला मंदिर, निर्मोही आखाडा यांच्यात विभागण्याचा आदेश.
  • २०१९ – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारे अनेक अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल.
  • २०१९ – सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा राम मंदिराच्या बाजूने निर्णय.
  • २०१९ – मुस्लिमांना पाच एकर स्वतंत्र जमीन देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश.
  • २०२० – ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन.
  • २०२४ – २२ जानेवारी रोजी भव्य श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठापना.
  • २०२४ – २३ जानेवारीपासून राम मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी होणार खुले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.