Ayodhya: राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी कधी खुले होणार? जाणून घ्या …

रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी (१७ जानेवारी) एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे.

175
Ayodhya: राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी कधी खुले होणार? जाणून घ्या ...
Ayodhya: राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी कधी खुले होणार? जाणून घ्या ...

अयोध्या राम मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रविवारपर्यंत (२१ जानेवारी) येथे धार्मिक विधी सुरू आहेत. त्यानंतर मंगळवारपासून (२३ जानेवारी) राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. भाविक-भक्तांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे.

रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी (१७ जानेवारी) एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे. अयोध्येत मंगळवारपासून भगवान श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली आहे. प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजा संपन्न झाली.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि प्राणप्रतिष्ठेचे मुख्य यजमान डॉ. अनिल मिश्रा यांच्या हस्ते विधी पार पडले. रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात प्रवेश करणार असून या मूर्तीचे परिसर भ्रमण केले जाणार असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.