BMC : महापालिकेचे आशिष शर्मा यांची बदली; डॉ. सुधाकर शिंदे हे नवीन अतिरिक्त आयुक्त

मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) हे १ मे २०२२ रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर या रिक्त जागी आशिष शर्मा यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली होती.

419

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर)आशिष शर्मा यांचे मागील काही महिन्यांपासून महापालिकेत मन रमत नव्हते. त्यामुळे महापालिकेतून लवकरच बदली करून घेणार अशी चर्चा असतानाच शुक्रवारी अखेर त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आशिष शर्मा यंची बदली नगरविकास खात्याच्या सचिवपदी झाली असून या रिक्तपदी डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुधाकर शिंदे हे १९९७च्या तुकडीतील आहेत.

मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) हे १ मे २०२२ रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर या रिक्त जागी आशिष शर्मा यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली होती. त्यानंतर शर्मा यांच्याकडे प्रथम शहर विभागाचा भार सोपवताना काही महत्वाच्या खात्यांचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला नव्हता. शर्मा हे प्रशासकीय सेवेतील तुकडीतील वरिष्ठ असतानाही अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे पश्चिम उपनगराचा भार आणि महत्वाची खाती दिल्यानंतरही शर्मा यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नव्हती. त्यातच महापालिका आयुक्त व प्रशासक चहल यांची शर्मा यांच्याबदलची भूमिका वेगळी असल्याने मागील काही महिन्यांपासून शर्मा हे बदलीच्या प्रयत्नात होते. परंतु शर्माच्या बदलीपूर्वी संजीव कुमार यांनी स्वत:ची बदली करून घेतली. त्यामुळे शर्मा यांची बदली कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता.

(हेही वाचा BMC : मुंबईतील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणार ४७७ पंप)

मात्र, एक वर्ष महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पद भुषवणाऱ्या आशिष शर्मा यांची अखेर बदली होऊन त्या जागी डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांची बदली नगरविकास खात्याच्या सचिवपदी करण्यात आली आहे. सुधाकर शिंदे यांनी यापूर्वी नवी मुंबई महापालिका आयुक्तपद भुषवले होते, याशिवाय इतर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.