Andheri Gokhale bridge : केवळ १४ महिन्यांत उड्डाणपूल उभारण्याची महापालिकेने केली किमया

गोखले पुलाचा पहिला टप्पा सुरू झाल्याने वाहनचालकांना पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी, पादचारी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठीही या पुलाचा वापर सोयीचा ठरेल.

1008
नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींवर मात करत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विक्रमी वेळेत म्हणजे  १४ महिन्यात गोपाळ कृष्ण गोखले पुलाची उभारणी करण्यात यश मिळवले आहे. रेल्वे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून महापालिकेने कामगिरी केली असून अंधेरी पश्चिमेकडून आता पूर्वेकडे गोखले पुलाने (Andheri Gokhale bridge) जावू शकतात. या एक मार्गिकेचे लोकार्पण उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. या पुलावरून हलक्या वाहनांनाच  वाहतुकीसाठी  केवळ प्रवेश असेल, मात्र अवजड वाहनांना बंदी असेल असे महापालिका  प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
gokhale road
गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या (Andheri Gokhale bridge) पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मार्गिकेची पुनर्बांधणी व पोहच रस्त्याचे काम तसेच अंधेरी येथील के पूर्व विभागातील ना. सी. फडके मार्ग आणि तेली गल्ली जंक्शन येथे ग्रेड सेपरेटर कामांचे लोकार्पण सोमवारी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले, या  प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक आमदार  अमीत साटम, स्थानिक आमदार  ऋतुजा लटके, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ ३)  रणजित ढाकणे, उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) (प्रभारी) संजय कौंडण्यपुरे, सहायक आयुक्त (के पश्चिम) डॉ.  पृथ्वीराज चौहान, सहायक आयुक्त (के पूर्व) मनीष वळंजू, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
gokhale1

वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचत

गोखले पुलाचा पहिला टप्पा सुरू झाल्याने वाहनचालकांना पश्चिम ते पूर्व असा प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी, पादचारी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठीही या पुलाचा वापर सोयीचा ठरेल तसेच वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे, असे  पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी नमुद केले.

लोकप्रतिनिधींची असलेली तळमळ

शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याप्रसंगी  बोलतांना, गोखले पुलाच्या (Andheri Gokhale bridge) कामासाठी स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींची असलेली तळमळ स्वतः पाहिली असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. मेट्रो, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प यासाख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई बदलते आहे. मुंबईत पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी उपसा करण्यासाठी लावलेल्या १६० पंपांमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनते आहे. त्या दर्जाच्या सेवा, सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असेही केसरकर यांनी नमूद केले.

मुंबईचा नियोजनबद्ध विकास गत दोन वर्षांत सुरू

अंधेरीतील स्थानिक नागरिकांचा दबाव, रेल्वे व महानगरपालिकेमधील समन्वय यामुळे गोखले उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शक्य झाले असल्याचे स्थानिक आमदार  अमीत साटम यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक उंचावला आहे.  मुंबईचा नियोजनबद्ध विकास गत दोन वर्षांत सुरू आहे, असेही अमीत साटम यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले…

देशातील स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात पूल उभारणीमध्ये अंधेरीच्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाने विक्रम रचला  असल्याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह यांनी सांगितले. कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिल्यानंतर अवघ्या १४ महिन्यात पुलाचा पहिला टप्पा म्हणजे एक मार्गिका खुली झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले. कारण त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून दोनवेळा उड्डाणपुलाच्या ठिकाणी भेट दिली, असे ते म्हणाले.

रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा 

तुळई (गर्डर) तयार करणार्‍या अंबाला येथील पुरवठादाराशी थेट संपर्क साधून प्रकल्पाला गती मिळवून दिली. उप मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी देखील रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करुन जुन्या पुलाचे पाडकाम, नवीन पुलाची उभारणी यासाठी मोठे प्रयत्न केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील वेळोवेळी आढावा घेत प्रकल्पाच्या वेगाला चालना दिली. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री  दीपक केसरकर यांनी स्थानिक पातळीवर उद्भवणाऱया समस्यांचे निराकरण केले. स्थानिक आमदार  अमीत साटम यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे, त्यांनी सतत पाठपुरावा करताना स्थानिक जनता व प्रशासन यामध्ये ताळमेळ साधला, सर्व सहकार्य केले, असेही चहल यांनी नमूद केले.

नवीन पुलाची उंची दीड मीटर वाढवणे अनिवार्य करण्यात आले…

उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू असताना रेल्वे विभागामार्फ़त नवीन धोरण जाहीर करण्यात आले.  त्यामुळे जुन्या पुलांचे पाडकाम करून उभारण्यात येणार्‍या नवीन पुलाची उंची दीड मीटर वाढवणे अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे या पुलाची उंची दीड ते पावणे दोन मीटरने वाढली आहे. हा तांत्रिक दोष नाही, असा खुलासा आयआयटी मुंबई, व्हीजेटीआय या संस्थांच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसांत रॅम्प विकसित करण्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे. कोणताही दोष उद्भवू नये यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने रॅम्प उभारला जाईल. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाणपुलाच्या उर्वरित तीन मार्गिकांचे कामही युद्ध पातळीवर पूर्ण करू, असेही आयुक्तांनी आश्वस्त केले.

गर्दीच्या वेळेत तीन मार्गिकांवर वाहतुकीसाठीचे नियोजन 

गोखले पुलावर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर प्रकल्पाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अवजड वाहनांना या पुलावर वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन हे मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. जास्त गर्दीच्या वेळेत तीन मार्गिकांवर वाहतुकीसाठीचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.