Ramdara Temple : पुण्यामध्ये आहे प्रभू श्रीरामांचं सुंदर देऊळ; रामदरा मंदिर

रामदरा हे नाव प्रभू रामचंद्रांमुळे पडलं आहे. मंदिराचं निर्मळ वातावरण आणि सुंदर बेट यामुळे भाविकांन इथे वेगळाच आनंद मिळते. जर तुम्हाला तुम्ही पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या निसर्गरम्य अध्यात्मिक वातावरणात वेळ घालवायचा असेल तर रामदरा मंदिर हे योग्य ठिकाण आहे.

428
Ramdara Temple : पुण्यामध्ये आहे प्रभू श्रीरामांचं सुंदर देऊळ; रामदरा मंदिर

पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ५० किमी अंतरावर लोणी काळभोर गावात रामदरा मंदिर (ramdara temple) आहे. पुण्यातून महामार्गावरुन गेल्यानंतर, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी तुम्ही उजवीकडे वळू शकता. तिन्ही बाजूंनी पाणी आणि टेकड्या, हे मंदिर जणू बेटावर तरंगत असल्याचे भासते. (Ramdara Temple)

देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ते उगीच नव्हे. रामदरा देऊळ (ramdara temple) हे लोणीजवळ असलेले प्राचीन मंदिर आहे. मात्र ते उध्वस्त अवस्थेत होते म्हणून धुंडी बाबांनी स्थानिक लोकांच्या मदतीने १९७० मध्ये प्राचीन मंदिरानुसार पुन्हा हे मंदिर उभारले. म्हणजे आजचं हे मंदिर धुंडी बाबांनी बांधलेलं आहे.

इथे मुख्य मंदिर शिवाचे आहे, परंतु मंदिर राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराशेजारी श्री देवीपुरी महाराजांचा आश्रम आहे, हे महाराज धुंडी बाबा म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मंदिरात एक नंदी देखील आहे. मंदिराशेजारी एक लहान तलाव आहे. मंदिर परिसर दाट झाडींनी वेढलेला आहे आणि मंदिराभोवतीचं निसर्गरम्य वातावरण आपल्याला मोहित करतं. विविध प्रकारचे पक्षी तुमचे मनोरंजन करण्यासाठी असतातच. (Ramdara Temple)

(हेही वाचा – Marathi Bhasha Gaurav Din : कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन !)

वडिवळेतले ‘जल मंदिर’

रामदरा (ramdara temple) हे नाव प्रभू रामचंद्रांमुळे पडलं आहे. मंदिराचं निर्मळ वातावरण आणि सुंदर बेट यामुळे भाविकांन इथे वेगळाच आनंद मिळते. जर तुम्हाला तुम्ही पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या निसर्गरम्य अध्यात्मिक वातावरणात वेळ घालवायचा असेल तर रामदरा मंदिर हे योग्य ठिकाण आहे. तसेच वडिवळे येथे ’जल मंदिर’ हे पाण्याच्या आत असलेले मंदिर आहे. पुणे शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या सासवडजवळील या मंदिरालाही तुम्ही भेट देऊ शकता. हे मंदिर १२ व्या शतकात बांधण्यात आले होते.

तुम्ही रामदरा मंदिरात (ramdara temple) प्रवेश करता तेव्हा एक अद्भुत अनुभूती तुम्हाला होते. हे मंदिर डोंगराने वेढलेले आहे. त्यामुळे दुरुन दिसत नाही. तलावावर शिवाचे मंदिर आहे, त्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला भव्य नंदी आपले लक्ष वेधून घेतो आणि एका वेगळ्याच अध्यात्मिक भावविश्वात आपल्याला घेऊन जातो. आतमध्ये असलेल्या मंदिरात प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि दत्तगुरुंची सुंदर मूर्ती आहे. इथे असलेले शिवलिंग स्वतः धुंडी बाबांनी तयार केलेले आहे. भिंतींवर विविध देवी देवता आणि संत महात्म्यांची सुंदर मूर्ती कोरलेली आहेत. (Ramdara Temple)

(हेही वाचा – BMC : वर्ष संपायला येताच महापलिका आयुक्तांना झाली झोपडीधारकांची आठवण !)

उंबराचे झाड म्हणजे जणू सुंदर पक्षांचा जमण्याचा चौक

मंदिराभोवती असलेली नारळाची आणि ताडाची झाडे मंदिराची शोभा वाढवतात. तसेच तलावात कमळाची फुले आहेत आणि तलावावर तरंगणारी बदके जणू श्रद्धावान भाविक म्हणून उपस्थित असतात. तलावाजवळ असलेल्या मार्गावरुन चालतात आपण सर्गात असल्याचा भास होतो. सुरुवातीला उंबराचे झाड म्हणजे जणू सुंदर पक्षांचा जमण्याचा चौक आहे. त्या झाडावर बसून पक्षी आपल्या भाषेत ईश्वराचे नामस्मरण करत असल्याची जाणीव होते.

खरंच हे रामदरा मंदिर (ramdara temple) म्हणजे अध्यात्मिक स्थळ, प्राचीन वारसा, निसर्गरम्य वातावरण या सर्वांचा उत्तम मिलाफ आहे. काकड आरती, पूजा, भक्तीगीते इत्यादींमुळे आपलं मन प्रसन्न राहतं. पुण्यात गेल्यावर या मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे. (Ramdara Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.