मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी आणखी एक बळी घेतला आहे. सोमवारी शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलावरील मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विकास लहू गोरे (३१) असे मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(TDRF Jawan Dies in Mumbai-Nashik Highway Pothole Accident)
(हेही वाचा : Vishwesh Negi यांची Iran मध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती; मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा)
भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील बचाव कार्यात सहभाग
बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे सोमवारी सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावर निघाले होते. मुंबई-नाशिक महामार्गाजवळील नदी पुलावर विकास गोरे चालवित असलेली दुचाकी खड्ड्यात गेल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचे दोन्ही चाक फुटले. विकास यांचा या घटनेत मृत्यू झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विकास हे जिल्ह्यातील अनेक बचाव कार्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत त्यांनी जीवाची बाजी लावून बचावकार्य केले होते. मात्र, इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा महामार्गावरील खड्ड्यांमुळे हकनाक बळी गेला.(TDRF Jawan Dies in Mumbai-Nashik Highway Pothole Accident)
(हेही वाचा : Satara DCC Bank Election : एका मतासाठी दोन लाखांची बोली; जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं?)
जवानाच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अपघात घडलेल्या ठिकाणी तातडीने पेव्हर ब्लॉक टाकून खड्डा बुजवण्यात आला. या कारवाईमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वेळेत दुरुस्ती केली असती तर एका कर्तव्यदक्ष जवानाचा जीव वाचला असता, मात्र, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.(TDRF Jawan Dies in Mumbai-Nashik Highway Pothole Accident)
हेही पाहा :


