Ind vs SL, Test Series : श्रीलंका कसोटी मालिकेत बुमराह ऐवजी ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी?

Ind vs SL, Test Series : श्रीलंका कसोटी मालिकेत बुमराह ऐवजी 'या' गोलंदाजाला मिळणार संधी?

95
India vs Sri Lanka Cricket 2026 : भारतीय संघात पदार्पणासाठी पाहावी लागली २ वर्षं वाट, नबी यावर पहिल्यांदाच बोलला
India vs Sri Lanka Cricket 2026 : भारतीय संघात पदार्पणासाठी पाहावी लागली २ वर्षं वाट, नबी यावर पहिल्यांदाच बोलला
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी(Ind vs SL, Test Series)संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता असून, त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकिब नबीची भारतीय संघात निवड होण्याची दाट शक्यता असल्याचं समजतंय. बुमराहच्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरता आले नसल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही घाई करणार नसल्याचे समजते.

श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवली जाणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी बुमराह उपलब्ध नसल्यास भारतीय गोलंदाजीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र, संघ व्यवस्थापन त्याच्या दीर्घकालीन तंदुरुस्तीला प्राधान्य देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

(हेही वाचा – Vishwesh Negi यांची Iran मध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती; मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा )

नबीने गेल्या दोन हंगामांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रणजी करंडक स्पर्धेत त्याने शंभरहून अधिक बळी घेत स्वतःची वेगळी छाप पाडली. जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक यशातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या स्विंग गोलंदाजी, अचूक टप्पा आणि सातत्यपूर्ण नियंत्रणामुळे निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे.

आकिब नबीची निवड झाल्यास तो परवेझ रसूल आणि उमरान मलिक यांच्यानंतर भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा तिसरा क्रिकेटपटू ठरेल. त्याच्यासाठी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय संधी असेल.

बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि इतर वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे. भारतीय संघ व्यवस्थापन नव्या वेगवान गोलंदाजांना संधी देण्याच्या भूमिकेत असल्याचेही संकेत मिळत आहेत.

बीसीसीआयकडून आकिब नबीच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुमराहची दुखापत आणि आकिब नबीला मिळणारी संभाव्य संधी हे श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेचे विषय ठरले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.