Veer Savarkar : पुण्यात ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथेही त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी, ठाणे, मुलुंड अशा काही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात येणार आहे.

250
Veer Savarkar : पुण्यात ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा
Veer Savarkar : पुण्यात ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra) लाखो क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिल्यामुळे भारताने स्वातंत्र्य मिळवले. या सशस्त्र क्रांतिकारकांचे अग्रणी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. १९२१ मध्ये अंदमानातून मुक्तता झाल्यावर सावरकरांना रत्नागिरी आणि त्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे ६ जानेवारी १९२४ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची कारावासातून मुक्तता झाली. येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) मुंबईला आणून ८ जानेवारी १९२४ ला सावरकरांना रत्नागिरीला नेण्यात येऊन स्थानबद्ध करण्यात आलं आणि प्रारंभ झाला त्यांच्या १३ वर्षांच्या ‘समाजक्रांती पर्वा’चा.

(हेही वाचा – Uniform Civil Code Act : राम मंदिरानंतर समान नागरी संहिता कायद्याची अंमलबजावणी)

… अशी असेल  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा’

१४ वर्षांच्या कठोर कारावासानंतर स्वातंत्र्यवीरांची मुक्तता झाली त्या घटनेला ६ जानेवारी २०२४ ला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हे वर्ष ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्ष’ (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Varsha) म्हणून साजरे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुक्ततेच्या शताब्दी वर्षारंभानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार, दि. ०६ जानेवारी २०२४ ला सकाळी ९.०० वा. येरवडा कारागृह ते कर्वे रस्त्यावरील (Karve Road) स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालय (Ferguson College) अशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा’ (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra) आयोजित करण्यात आली आहे.

हिंदू संघटना आणि कार्यकर्ते यांचा सहभाग

मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, निगडी अशा ठिकाणांहूनही अनेक हिंदू संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी घेऊन यात्रेत सहभागी होणार आहेत. बालगंधर्व चौक (Balgandharva Chowk), कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे यात्रेचे स्वागत करण्यात येईल आणि फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ (Ferguson College) यात्रेची सांगता होईल.

(हेही वाचा – Panvel-Karjat Rail Line : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर; न्यायालयाने केला हस्तक्षेप)

अनेक मान्यवर रहाणार उपस्थित

या यात्रेला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित (भूतपूर्व पोलीस महासंचालक), कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, भाजपा नेते सुनील देवधर, मेधा कुलकर्णी, सावरकर व्याख्याते आणि अभिनेता शरद पोंक्षे आणि अभिनेता रणदीप हुडा, तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथेही होणार कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथेही त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. वाशी, ठाणे, मुलुंड अशा काही ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात येईल. (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra)

संतोष कारकर, सौरभ धडफळे, सीए रणजीत नातु, सायली जोशी, आशिष जोशी, सचिन बोधनी, श्रीनिवास कुलकर्णी, श्वेता परुळकर, शैलेन्द्र चिखलकर, विनायक काळे, प्रांजल अक्कलकोटकर, उत्तरा मोने अशा अनेकांचे या सगळ्या कार्यक्रमांसाठी मोलाचे योगदान मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.