Panvel-Karjat Rail Line : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर; न्यायालयाने केला हस्तक्षेप

Panvel-Karjat Rail Line : रेल्वे रुळांचे काम वेगाने सुरू करण्यात यावे, असे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. सोमेश्वर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

179
Panvel-Karjat Rail Line : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर; न्यायालयाने केला हस्तक्षेप
Panvel-Karjat Rail Line : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर; न्यायालयाने केला हस्तक्षेप

पनवेलहून कर्जतला जातांना आता वेळेची बचत होणार आहे. पनवेल-कर्जत रेल्वे (Panvel-Karjat rail) मार्गातील अडथळा मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) हस्तक्षेपानंतर दूर झाला आहे. (Panvel-Karjat Rail Line)

(हेही वाचा – India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार)

शाळेने केली होती याचिका

पनवेल-कर्जत मार्गावर (Panvel-Karjat rail) लोकलसाठी दोन नवीन रूळ टाकले जात आहेत. रेल्वे रूळांमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन खालापूर (Khalapur) येथील एका शाळेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या शाळेने कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत रेल्वे अधिकारी (Railway Officer) आणि शाळा प्रशासनाने संयुक्तपणे जागेची पाहणी केली.

दहा फूट उंच भिंत उभारण्याचे शाळेला आश्वासन

या पथकाने शाळेजवळ रेल्वे ट्रॅक कशा पद्धतीने बांधता येईल, याचा एक आराखडा रेल्वेने सादर केला आहे. (Panvel-Karjat Rail Line) या आराखड्यामध्ये शाळेजवळ दहा फूट उंच भिंत उभारली जात आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून शाळेने संमती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने शाळेची याचिका निकालात काढली आहे. तसेच रेल्वे रुळांचे काम वेगाने सुरू करण्यात यावे, असे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना (Railway officials) दिले आहेत. न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. सोमेश्वर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

(हेही वाचा – UPI Payments : २०२३ मध्ये युपीआय व्यवहार पोहोचले १०० अब्जांच्या घरात)

डिसेंबर 2016 मध्ये मिळाली होती मंजुरी

ही रेल्वे मार्गिका 2025 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे रायगड (Raigad) जिल्ह्याचा विकास होणार आहे. सध्या पनवेल (Panvel) ते कर्जत (Karjat) दरम्यान एकच मार्गिका आहे. या मार्गिकेवर प्रामुख्याने मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातात. डिसेंबर 2016 मध्ये या नव्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.

असे असेल मार्गिकेचे स्वरूप

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गामुळे या प्रवासातील अर्ध्या घंट्याचा वेळ वाचणार आहे. या मार्गावर 3 बोगदे, 2 उड्डाणपूल, 44 छोटे आणि मध्यम आकाराचे पूल, 15 रस्त्यांखालील पूल आणि सात रस्त्यांवरील पूल असतील. या मार्गिकेसाठी 2,783 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात नढाल, किरवली आणि वावर्ले अशा तीन बोगद्यांची उभारणी करण्यात येणार आहे. (Panvel-Karjat Rail Line)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.