Babar Azam : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम

आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत बाबर आझमने पाकिस्तानला पिछाडीवरून बाजी मारून दिली

187
Babar Azam : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम
Babar Azam : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड दरम्यानच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना जिंकून पाकिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली. आणि त्याचदरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रमही मोडीत निघाले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) विराट कोहलीलाही (Virat Kohli) मागे टाकलं. खरंतर मालिकेत पाकिस्तानची सुरुवात पराभवाने झाली होती. पण, नंतरचे दोन सामने जिंकून पाकिस्तानने विजय खेचून आणला. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ६ गडी राखून विजय झाला.

बाबर आझम (Babar Azam) पाक संघाचा विजयाचा शिल्पकार ठरला. ४२ चेंडूंत ७५ धावा करताना त्याने ५ षटकार आणि ६ चौकार ठोकले. टी-२० सामन्यांत ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीला (Virat Kohli) आता मागे टाकलं आहे. ५० पेक्षा जास्त धावा करण्याची बाबरची ही ३९ वी खेप होती. टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत हा विक्रम विराटच्या नावावर होता. विराटने ही कामगिरी ३८ वेळा केली आहे. आणि यात ४ शतकंही आहेत. पाठोपाठ रोहित शर्माने (Rohit Sharma) ही कामगिरी ३४ वेळा केली आहे.

(हेही वाचा – James Bond ची भूमिका साकारणारा अष्टपैलू अभिनेता)

इतकंच नाही तर बाबरने बेंजामिन व्हाईटच्या एका षटकात ४ षटकारांसह २५ धावा वसूल केल्या. आणि पाकिस्तानसाठी हा विक्रम आहे. बाबरने मोहम्मद रिझवान (५६) सह तिसऱ्या गड्यासाठी १३९ धावांची भागिदारी रचली. या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी भागिदारी रचण्याची ही १० वी खेप आहे. शिवाय या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भागिदारीत ३,००० धावांचा टप्पा पार केला आहे. हा ही एक विक्रमच आहे. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी आतापर्यंत ५ शतकी भागिदारी रचल्या आहेत. तर आयर्लंडची अँड्र्यू बॉलबर्डी आणि पॉल स्टर्लिंग या जोडीने भागिदारीत २,०१४ धावा केल्या आहेत. पण, या दोन्ही जोड्यांपेक्षा पाकिस्तानची जोडी कितीतरी पुढे आहे.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये टी-२० मालिका खेळणार आहे. आणि तिथूनच संघ वेस्ट इंडिजला रवाना होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.