Pneumatic Roller : खोदलेले चर बुजविण्यासाठी करणार न्यूमेटिक रोलरचा वापर

मुंबईतील विविध भागात सेवा सुविधा पुरवण्यासाठी केबल्स, वाहिन्या टाकण्यात येतात. काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा नव्याने सेवा पुरवायच्या असल्यास पुन्हा खोदकाम करून या केबल्स, वाहिन्या टाकल्या जातात. या वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी करता महापालिकेला संबंधित संस्था तथा खाते, विभाग आदिंकडून शुल्क भरले जाते.

513
Pneumatic Roller : खोदलेले चर बुजविण्यासाठी करणार न्यूमेटिक रोलरचा वापर
Pneumatic Roller : खोदलेले चर बुजविण्यासाठी करणार न्यूमेटिक रोलरचा वापर
मुंबईत विविध ठिकाणी सेवा सुविधांचा जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या (Numerical Roller) चरी बुजवण्यासाठी आता रोलरचा वापर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी कंत्राटदारांची निवड करताना ही अट घातली आहे. विशेष म्हणजे सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणारे चर हे बहुतांशी पदपथावर खोदले जातात. त्यामुळे हे चर बुजवताना पदपथ किंवा रस्ते हे सुस्थितीत आणण्यासाठी न्यूमेटिक रोलरचा वापर करणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. या न्यूमेटिक रोलरचा वापरच मोठ्या रस्त्यांवर केला जातो, त्यामुळे ही अट घालून प्रशासन चांगल्या प्रकारे चर बुजवणार आहे की त्या नावाखाली काही कंत्राटदारांच्या गळी ही कामे उतरविण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pneumatic Roller)

मुंबईतील विविध भागात सेवा सुविधा पुरवण्यासाठी केबल्स, वाहिन्या टाकण्यात येतात. काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा नव्याने सेवा पुरवायच्या असल्यास पुन्हा खोदकाम करून या केबल्स, वाहिन्या टाकल्या जातात. या वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चरी करता महापालिकेला संबंधित संस्था तथा खाते, विभाग आदिंकडून शुल्क भरले जाते. त्या आकारलेल्या शुल्कातून महापालिका परिमंडळ निहाय  कंत्राटदार नेमून त्यांच्याकडून ही कामे करून घेतात. यापूर्वी मार्च २०२२ रोजी नेमलेल्या कंत्राटदारांकडून कामे करून घेण्यासाठी ३८३ कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यानुसार हा निधि संपल्याने नवीन निविदा राबवून कंत्राटदारांची निवड होईपर्यंत १५ टक्के पर्यंत निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यानुसार आता महापालिकेने सात परिमंडळमध्ये प्रत्येकी ४० कोटी या प्रमाणे २८० कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवली आहे. (Pneumatic Roller)

(हेही वाचा-India T20 Team : भारताच्या टी-२० संघ निवडीपूर्वी अजित आगरकर रोहित, विराटशी बोलणार)

या निविदेतील कार्य पद्धतीवर शंका उपस्थित करून याबाबतची तक्रार बी एस इंफाटेक नावाच्या कंपनीने केली आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेल रासू यांच्या पत्र लिहून या कंपनीने तक्रार केली असून या तक्रारीची दखल न घेतल्याने पुन्हा एकदा त्यांनी स्मरण पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी निविदेत भाग घेणाऱ्या कंपन्यांनी डंपर व इतर अतिरिक्त वाहने यासाठी कागद पत्रे सादर केली आहेत, जी बोगस असल्याचे म्हटले आहे. निविदेत स्वमालकीची वाहने असावीत असे नमूद केले. अशी स्वमालकीची काही मोजक्याच कंपनीच्या मालकांकडे अतिरिक्त यंत्रे व वाहने उपलब्ध असून इतर कंपन्यांकडे स्वतःच्या मालकीची अतिरिक्त वाहनेच नाही. त्यामुळे निविदेत भाग घेणाऱ्या सर्व कंपन्यांच्या सादर केलेली वाहनांची कागदपत्रे यांची छाननी करावी तसेच वाहनांचे आर सी बुक चेक करावे. जेणेकरून कोणाकडे स्वतःच्या मालकीची अतिरिक्त वाहने आहेत आणि कुणी बोगस कागदपत्रे सादर केली यांची  माहिती  समोर येईल. या छाननीमध्ये जर  ज्यांची बोगस कागद पत्रे आढळून येतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी त्या पत्रात केली आहे. (Pneumatic Roller)

तसेच या निविदेत न्यूमेटिक रोलरचा वापर करण्याची अट घातली आहे. या रोलरचा वापर मोठ्या रस्त्यांच्या कामात केला जातो. जिथे पदपथ आणि रस्त्यांच्या बाजूला चर खोदले जातात, ते बुजवतना न्यूमेटिक रोलरचा वापर जास्त होत नाही, परंतु ही अट का आणि कुणासाठी घातली असा प्रश्न खुद्द अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. पदपथावर आपण रोलर चालवू शकत नाही. तिथे या रोलरची अट घालणे हेच शंकास्पद वाटते. (Pneumatic Roller)

याबाबत रस्ते प्रमुख अभियंता मनिष पटेल यांना विचारले असता त्यांनी या निविदेत ज्या ज्या कंपन्यांनी भाग घेतला आहे आणि त्या कंपन्यांनी जी जी कागदपत्रे सादर केली  आहेत त्या सर्वांची पडताळणी केली जाणार आहे. या कागदपत्रांच्या छाननीमध्ये जर त्यांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले तर महापालिकेच्या नियमानुसार संबंधितांवर दंडात्मक तसेच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Pneumatic Roller)

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=diSujIVEBRI

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.