उन्हाळी सुट्ट्यांनंतर राज्यातील शाळांना सुरुवात; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.

174
उन्हाळी सुट्ट्यांनंतर राज्यातील शाळांना सुरुवात; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा

राज्यातील बऱ्याच शाळांना एप्रिल महिन्याच्या मध्यापासून उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांनी खूप मज्जा – मस्ती केली. मात्र त्यांच्या या मस्तीच्या वेळेमध्ये आता बदल होणार आहे. कारण गुरुवार १५ जून पासून विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. विदर्भ वगळता १५ जून पासून राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

(हेही वाचा – शहरातील अनेक डॉक्टरांना लुटणारी आर्टिस्ट,ओला ड्रायव्हर, आणि सफाई कर्मचारी यांची टोळी गजाआड)

विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवार दिनांक १५ जून २०२३ पासून सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देखील देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

राज्याच्या काही शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन, गोड खाऊ देऊन, ओवाळून या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.