Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांची पहिली सभा नारायण राणेंसाठी

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची ही पहिली जाहीर सभा असेल.

126
Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांची पहिली सभा नारायण राणेंसाठी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. येत्या ४ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरेंची सभा कणकवली येथे होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही पहिली जाहीर सभा असेल. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील पटांगणात ही सभा होणार असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या सभेची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दिल्लीत काँग्रेसचे दोन तुकडे होणार!)

राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नारायण राणे यांच्यात फार पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघेही पूर्वी शिवसेनेत होते. मात्र राणे यांनी २००५ मध्ये तर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडली. त्यानंतर दोघांच्याही राजकीय वाटा वेगवेगळ्या होत्या. मात्र दोन्ही नेत्यांनी त्यांची मैत्री सांभाळली आहे. (Lok Sabha Election 2024)

नारायण राणे सध्या भारतीय जनता पार्टीत असून त्यांना पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेचं तिकीट दिले आहे. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) आणि नारायण राणे राजकीय पटलावर एकत्र आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे राणे यांच्या प्रचारासभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.