Mumbai Nala Safai : नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा; कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्‍यक्ष आगमन होण्‍यापूर्वी महानगरपालिकेच्‍या पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाच्‍या माध्‍यमातून मुंबईत मोठ्या नाल्‍यांमधून गाळ काढला जातो.

492
Mumbai Nala Safai : नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा; कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

मुंबईत पावसाळा पूर्व मोठ्या व लहान नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात झाली असून मोठ्या नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामांपैकी ३१ ठिकाणी कामात निष्‍काळजीपणा, त्रुटी निदर्शनास आल्‍या आहेत. हा निष्‍काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या कंत्राटदाराना मिळून एकूण ३० लाख ८३ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान नालेसफाईचे काम ६१ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. (Mumbai Nala Safai)

मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्‍यक्ष आगमन होण्‍यापूर्वी महानगरपालिकेच्‍या पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाच्‍या माध्‍यमातून मुंबईत मोठ्या नाल्‍यांमधून गाळ काढला जातो. तर, विभाग कार्यालयांच्‍या पातळीवर लहान नाल्‍यांमधून गाळ काढण्‍याची कामे केली जातात. नाल्‍यांमधून गाळ काढल्‍याने पावसाळी पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍यास मदत होते. मुंबई महानगरातील पर्जन्‍यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्‍यांमधून किती गाळ उपसणे आवश्‍यक आहे, याचा अभ्‍यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित करण्‍यात येते. (Mumbai Nala Safai)

आतापर्यंत ६१ टक्के काम पूर्ण

यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट निश्चित करण्‍यात आले आहे. पैकी आतापर्यंत ६ लाख २३ हजार ६३१ मेट्रिक टन म्‍हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ६१.०३ टक्‍के गाळ काढण्‍यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मार्चच्‍या पहिल्‍या आठवड्यात यंदाही नाल्‍यांतून गाळ काढण्‍याची कामे वेगाने सुरू करण्‍यात आली. या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्‍याचे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. (Mumbai Nala Safai)

(हेही वाचा – अमेठीत बसपाच्या उमेदवार; Congress ला बसणार फटका?)

एकूण ३० लाख ८३ हजार रुपयांच्या दंड

शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची पाहणी व तपासणी दरम्यान २९ एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ३१ ठिकाणी कंत्राटदारांना दंड ठोठाविण्‍यात आला आहे. त्‍यात शहर विभागातील १२ ठिकाणच्‍या कंत्राटदारांचा (१९ लाख ७५ हजार रूपये), पूर्व उपनगरातील १० कंत्राटदारांचा (७ लाख २० हजार रूपये) आणि पश्चिम उपनगरातील ९ कंत्राटदारांचा (३ लाख ८८ हजार रूपये) समावेश आहे. कामातील त्रुटीनुसार दंड रक्‍कम निश्चित करण्‍यात आली आहे. कंत्राटदारांच्‍या देय रकमेतून सदर दंडाची रक्कम कापून घेण्यात येणार आहे. (Mumbai Nala Safai)

गोवंडी येथील डम्पिंग नाल्याच्या सफाईला अद्याप नाही सुरुवात

शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान गोवंडी येथील डम्पिंग नाला या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात न केल्याने कंत्राटदार डी. बी .इन्फ्रास्ट्रक्चर यांना रुपये एक लाख दंड लावण्यात आला आहे. (Mumbai Nala Safai)

अशाप्रकारे केला आहे दंड

शहर विभागातील १२ ठिकाणच्‍या कंत्राटदारांचा (१९ लाख ७५ हजार रूपये)
पूर्व उपनगरातील १० कंत्राटदारांचा (७ लाख २० हजार रूपये)
पश्चिम उपनगरातील ९ कंत्राटदारांचा (३ लाख ८८ हजार रूपये) (Mumbai Nala Safai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.