Lok Sabha Election 2024 : दिल्लीत काँग्रेसचे दोन तुकडे होणार!

दिल्लीत आतापर्यंत भाजपा आणि आप-कॉंग्रेस आघाडीत लढत होणार होती. परंतु, आता चित्र बदलण्याची शक्यता आहे. लवली आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अपक्ष निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

71
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत काँग्रेसचे दोन तुकडे होणार!

अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आपशी आघाडी आणि बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यामुळे दिल्लीतील कॉंग्रेसचे नेते प्रचंड नाराज झाले आहे. आता अर्ध्यापेक्षा जास्त नेते पक्ष सोडण्याची तयारी करीत असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री राजकुमार चौहान यांनी आम आदमी पक्षाशी (आप) युती, बाहेरच्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी आणि प्रदेश प्रभारींची मनमानी या तीन कारणांना वैतागून अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता ही ठिणगी आगीत बदलल्याशिवाय राहणार नाही अशाप्रकारची ताकीद नेत्यांकडून हायकमांडला दिली जात आहे. (Lok Sabha Election 2024)

अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘वेट अॅड वॉच’ची भूमिका घेतली आहे. आपण लवकरच नेते आणि कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून भविष्याची रणनीती ठरवणार आहोत. मात्र, दिल्ली कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. कॉंग्रेसने लवली यांना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. यापूर्वीचा अडीच ते तीन वर्षाचा काळ कॉंग्रेससाठी फार वाईट होता. (Lok Sabha Election 2024)

पक्ष संघटना कोलमडून पडली होती. नेते पक्ष सोडून जात होते. मात्र लवली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्ष पुन्हा एकदा उभा राहू लागला. लवली यांनी घरात बसलेल्या नाराज नेत्यांना बाहेर काढले आणि पक्षाला एक नवी उभारी देण्याचे काम केले होते. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीत मतदान होणे आहे. दिल्लीतील सात जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. अशा बिकट स्थितीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लवली यांनी पदाचा राजीनामा दिला. यामुळे, कॉंग्रेसपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

दिल्लीत तिरंगी लढत होणार?

दिल्लीत आतापर्यंत भाजपा आणि आप-कॉंग्रेस आघाडीत लढत होणार होती. परंतु, आता चित्र बदलण्याची शक्यता आहे. लवली आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अपक्ष निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. लवली यांचा कन्हैया कुमार यांच्या उमेदवारीला विरोध होता. परंतु, पक्षाने लवली यांच्या मताकडे दुर्लक्ष करीत कन्हैया कुमारला उमेदवारी दिली. (Lok Sabha Election 2024)

आपशी आघाडी केल्यामुळे नेते नाराज

दिल्लीतील सर्व सातही जागा कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्यात अशी दिल्लीतील कॉंग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती. परंतु, कॉंग्रेसने अवघ्या तीन जागा घेऊन आम आदमी पक्षाशी आघाडी केली. ही बाब स्थानिकांना खटकली आहे. (Lok Sabha Election 2024)

उदित राज राज्य युनिटकडे दुर्लक्ष करत आहेत

आश्चर्यची गोष्ट अशी की, ईशान्य दिल्लीतील पक्षाचा उमेदवार कन्हैया कुमार आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतील उमेदवार उदित राज हे राज्य युनिटकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत आणि पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना दुखावणारी विधाने करत आहेत. (Lok Sabha Election 2024)

कन्हैया कुमारने आपल्या लोकसभा मतदारसंघात लावलेल्या होर्डिंग्जमध्ये लवली यांचे तर सोडाच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोटोही छापला नाह आहे. याउलट, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो लावला असल्याची माहिती आहे. शीला सरकारच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत कन्हैया केजरीवालांचेही कौतुक करत आहे. (Lok Sabha Election 2024)

गेल्या आठवड्यात उदित राज काँग्रेसला चार टक्के मतांपर्यंत मर्यादित असलेला पक्ष म्हणताना दिसले. यामुळे पक्षातील जुन्या नेत्यांची नाराजी आणखी वाढली आहे. बाबरिया यांच्या वागण्यामुळे आगीत आणखीनच भर पडत आहे. यामुळे लवलीचा संयम संपला. (Lok Sabha Election 2024)

दिल्ली प्रभारी बाबरियावर नाराजी

काल रविवारच्या सकाळी जवळपास ३० माजी आमदार लवली यांच्या घरी पोहोचले आणि पुढच्या रणनितीवर चर्चा केली. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही बाबरिया यांच्याविरोधात २०० हून अधिक ईमेल हायकमांडला पाठवले आहेत. शीला सरकारमध्ये मंत्री असलेले राजकुमार चौहान म्हणाले, “दिल्लीचे प्रभारी दीपक बाबरिया यांना दिल्लीतून हटवा आणि काँग्रेसला वाचवा.” (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Mumbai Cash Seized: दादरमध्ये नाकाबंदी कारवाईत सापडली रोकड, निवडणुकीच्या काळात पोलिसांची कारवाई)

लवली काय म्हणाले याकडे लक्ष देण्याची गरज – संदीप दीक्षित

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनीही कॉंग्रेसला झोपेतून उठण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “पक्षाचा एक कार्यकर्ता आणि प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्याने वैयक्तिकरित्या दु:ख झाले आहे. लवली यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याकडे हायकमांडने लक्ष देण्याची गरज आहे’. माजी आमदार नीरज बसोया म्हणाले, “लवली यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा दिला आहे. बाबरिया यांच्या कार्यशैलीमुळे सर्वत्र समस्या निर्माण झाल्या आहेत, मग ते दिल्ली असो किंवा हरियाणा आणि सर्व कामगार संतप्त झाले आहेत.” (Lok Sabha Election 2024)

‘बाबरिया यांनी राजीनामा द्यावा’

माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांचे माजी मुख्य मीडिया समन्वयक आणि ऑल इंडिया शिया पर्सन्स लॉ बोर्डाचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष मेहदी माजिद यांनीही लवली यांच्या राजीनाम्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ज्यांना दिल्लीचे राजकारण कळत नाही, त्या दीपक बाबरिया यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. आता कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचणार आहे. (Lok Sabha Election 2024)

‘मी लवलीच्या शब्दांशी सहमत आहे’

एआयसीसी सदस्य ओमप्रकाश बिधुरी म्हणाले की, लवली यांनी राजीनामा देण्याची जी कारणे दिली आहेत ती सर्व खरी आहेत आणि त्या सर्व कारणांशी मी सहमत आहे. आम आदमी पक्षाशी युती करणे हा अत्यंत घातक निर्णय आहे, ज्या पक्षाचा नेता किंवा पक्ष काँग्रेसच्या विरोधात बोलून सत्तेत आला होता, त्या पक्षाशी युती करण्याची गरजच काय होती? असे त्यांचे म्हणणे आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.