शहरातील अनेक डॉक्टरांना लुटणारी आर्टिस्ट,ओला ड्रायव्हर, आणि सफाई कर्मचारी यांची टोळी गजाआड

या तिघांना मोठ्या शिताफीने मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे.

226
शहरातील अनेक डॉक्टरांना लुटणारी आर्टिस्ट,ओला ड्रायव्हर, आणि सफाई कर्मचारी यांची टोळी गजाआड

गेल्या काही दिवसांपासून ज्युनिअर आर्टिस्ट, ओला ड्राईव्हर आणि सफाई कामगार यांची टोळी शहरातील नामांकित डॉक्टरांना लुटत होती. हा प्रकार मुंबईतील पश्चिम उपनगरात उघडकीस आल्यानंतर या तिघांना मोठ्या शिताफीने मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. या तिघांनी मुंबई शहरासह इतर अनेक जिल्ह्यामध्ये या प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विवेक सदरे (३०), अविनाश अरोरा (३०) आणि राहुल कैलास जठार (३२) असे या अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही अंधेरी वर्सोवा परिसरात राहणारे असून विवेक सदरे हा गोरेगाव फिल्मसिटी येथे ज्युनिअर आर्टिस्टचे काम करतो तर अविनाश अरोरा हा कॅब ड्रायव्हर आहे,आणि तिसरा आरोपी जठार एका खाजगी कंपनीत हाऊस किपिंग (साफसफाई) चे काम करतो. या तिघांनी मिळून पश्चिम उपनगरातील नामांकित डॉक्टर व त्याच्या हॉस्पिटलला आपले लक्ष केले होते.

(हेही वाचा – Auto : ‘या’ ऑटो रिक्षात आहे महागड्या गाडीसारखी सुविधा; तुम्हालाही रिक्षात बसावसं वाटेल)

अशी करायचे लूट…

हे तिघेही पश्चिम उपनगरातील डॉक्टरांना कॉल करून आपण महानगरपालिका अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या खाजगी रुग्णालया बाहेर लावण्यात आलेला साईन बोर्ड (फलक) बेकायदेशीर असल्याचे सांगून कारवाईच्या नावाखाली डॉक्टरांकडून ऑनलाईन माध्यमातून पैसे उकळायचे . याप्रकरणी पश्चिम उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात डॉक्टरांकडून फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.

या गुन्ह्याचा संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष ९चे पोलीस निरीक्षक करीत होते. कक्ष ९चे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून संशयावरून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्या तिघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी दिली. या त्रिकुटावर पश्चिम उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात १०पेक्षा अधिक फसवणूक, खंडणी, मारहानीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी यावेळी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.