Auto : ‘या’ ऑटो रिक्षात आहे महागड्या गाडीसारखी सुविधा; तुम्हालाही रिक्षात बसावसं वाटेल

188
बंगळुरु येथील ऑटो रिक्षाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. ही रिक्षा लक्झरी कारपेक्षा कुठेच कमी नाही. आपल्या प्रवाशांना सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी एका रिक्षा चालकाने आपल्या रिक्षाचे रुपांतर ५ स्टार रिक्षामध्ये केले आहे. ही रिक्षा ज्यावेळी रस्त्याने धावते तेव्हा लोक रिक्षाकडे पाहतच राहतात.
बदलत्या युगासोबत बदलणे हे काही लोकांनाच जमते. अजित सहानी या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडिओ सामायिक करण्यात आला आहे. “हॅलो बंगळुरु, किती सुंदर आणि अद्भुत ऑटो आहे. आतापर्यंत यामध्ये कोणी प्रवास केला आहे का? असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या ट्विटला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स येत आहेत.
या व्हिडिओमध्ये आपल्याला एक सुंदर आणि अद्भुत रिक्षा दिसते. या ऑटो रिक्षामध्ये कुशन, आरामदायक सीट्स, टेबल, पंखे आणि डिजिटल डिस्प्ले व म्युझिक सिस्टिम आहे. त्यामुळे ग्राहकांना रिक्षात बसल्यावर विलासी कारमध्ये बसल्याचा आनंद प्राप्त होतो.
ही अद्भुत ऑटो रिक्ष इथे पाहा:
या रिक्षाच्या मागे रंगीत टिकर चालत असतं. त्याचबरोबर हा रिक्षाचालक कन्नड चित्रपटांचा चाहता दिसतो. कारण कन्नड अभिनेता राजकुमार आणि शंकार नाग यांचे पोस्टर्स देखील लावलेले आहेत. काहीतरी वेगळं करणं, कल्पक गोष्टी करणं हे काही लोकांना खूप छान जमतं. असा प्रयोग अनेकांनी करुन बघायला काय हरकत आहे!
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.