Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर वेळापत्रक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.३३ वाजता सुटेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून दुपारी ४.१९ वाजता सुटेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.१० वाजता सुटणार आहे.

190
Railway Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर वेळापत्रक

मध्य रेल्वेवर रविवारी म्हणजेच ३ मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

(हेही वाचा – Bangalore Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, ५ जण जखमी)

जाणून घ्या ब्लॉकचे वेळापत्रक :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबतील आणि नंतर डाऊन मार्गावर वळवण्यात येईल. (Railway Mega Block)

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

(हेही वाचा – Narendra Modi: झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जमकर खावो; कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत मोदी म्हणाले…)

डाऊन धीमी लाइन :

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. तसेच ब्लॉकनंतर पहिली लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी ४.०१ वाजता डोंबिवली करीता सुटेल. (Railway Mega Block)

अप धीमी लाईन :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ही ठाणे लोकल असेल जी ठाणे येथून दुपारी ३.३६ वाजता सुटेल.(Railway Mega Block)

डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद  :

मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (Railway Mega Block)

(हेही वाचा – Maharashtra budget sessiont : घोषणांचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ; विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणला)

डाउन हार्बर लाईनवर :

ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ वाजता सुटेल. वाशी करीता शेवटची ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३६ वाजता सुटेल. (Railway Mega Block)

अप हार्बर लाईनवर :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.३३ वाजता सुटेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून दुपारी ४.१९ वाजता सुटेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.१० वाजता सुटणार आहे. (Railway Mega Block)

(हेही वाचा – RBI : २००० रुपयांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेनी दिली ‘ही’ माहिती)

विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील :

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द विभागात विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गांवर प्रवास करण्याची परवानगी असेल. (Railway Mega Block)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.