Narendra Modi: झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जमकर खावो; कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत मोदी म्हणाले…

यावेळी मोदींनी सांगितले की, भारतातील युरिया उत्पादन 2014 मध्ये 225 लाख टनांवरून आता 310 लाख टन झाले आहे, जे खताच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

100
Narendra Modi: झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जमकर खावो; कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत मोदी म्हणाले...
Narendra Modi: झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जमकर खावो; कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत मोदी म्हणाले...

झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने फक्त आदिवासींना व्होट बँक मानलं आणि घराणेशाहीला प्रोत्साहन दिले. झारखंडमध्ये झपाट्याने विकास होण्यासाठी येथे कायदा आणि सुव्यवस्था चांगली असणे आवश्यक आहे, प्रशासन प्रामाणिक असणे आवश्यक आहे, परंतु जेव्हापासून येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे घराणेशाही, भ्रष्ट आणि तुष्टीकरणाचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून येथील परिस्थिती बदलली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जमकर खावो (भरपूर खा) असे म्हणत नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

शुक्रवारी झारखंड येथील सिंद्री खत कारखान्याचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संकल्पाची पूर्ती झाल्याबाबत ते म्हणाले की, सिंद्री येथील खताचा कारखाना नक्की सुरू करेन, असा संकल्प मी केला होता. ही मोदींची हमी होती. आज ती पूर्ण झाली आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाकारले; काय कारण दिले? )

आश्वसनाची पूर्तता झाली…
यावेळी त्यांनी सांगितले की, भारतातील युरिया उत्पादन 2014 मध्ये 225 लाख टनांवरून आता 310 लाख टन झाले आहे, जे खताच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. झारखंडमध्ये 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेल्वे, ऊर्जा आणि कोळसा प्रकल्पही सुरू केले. झारखंडला 35 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे. सिंद्री खत प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले.

जलद विकास -भाजपाचे उद्दिष्ट
असे सांगून ते पुढे म्हणाले की, विकास, विकास आणि जलद विकास हे भाजपचे उद्दिष्ट आहे. तर काँग्रेस असो वा मित्रपक्ष, ते विकासाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यामुळेच आज देश म्हणतो आहे, जिथे इतरांकडून आशा संपते, तिथून मोदींची हमी सुरू होते.

खत प्रकल्प राष्ट्राला समर्पित…
झारखंडमध्ये 35,700 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी झाली. हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडचा (HURL) धनबाद जिल्ह्यातील सिंद्री येथे 8,900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेला खत प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेला संबोधित करताना झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.