Sharad Pawar : शरद पवारांचे जेवणाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाकारले; काय कारण दिले?

337
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती शहरात शनिवारी, २ मार्च रोजी नमो’ रोजगार मेळावा पार पडणार आहे. रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भोजनाचे खास आमंत्रण दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण नाकारल्याची माहिती समोर आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला असला तरी शरद पवार (Sharad Pawar) हे मात्र ठामपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांशी संघर्ष रंगत आहे. अशातच बारामतीत होत असलेल्या नमो रोजगार मेळाव्याला सरकारकडून शरद पवार यांना निमंत्रण देण्याचे टाळण्यात आले होते. त्यानंतर पवारांनीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण देत त्यांची कोंडी केली होती. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे भोजनास येऊ शकत नाही, असे उत्तर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून शरद पवार यांना पाठवण्यात आल्याचे समजते. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही हे निमंत्रण नाकारले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.