Prakash Ambedkar: काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये जागांवरून घमासान 

Prakash Ambedkar: स्वतंत्र लढलो, तर सहा जागा जिंकू

165
Prakash Ambedkar: काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये जागांवरून घमासान 
Prakash Ambedkar: काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये जागांवरून घमासान 
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उबाठा (Shivsena UBT) यांच्यात जागावाटपावरून प्रचंड वाद असल्याची माहिती  वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जनतेसमोर मांडली. काँग्रेस आणि उबाठामध्ये घमासान सुरु असून त्यांचे भांडण मिटल्यावर वंचित (Vanchit) आघाडी चर्चा करेल. तसेच वंचित (Vanchit) आघाडी लोकसभा निवडणूक वेगळी लढल्यास सहा जागा जिंकेल, असा विश्वास आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केला.
तोवर आम्ही उपरे
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते नाना पटोले (Nana Patole), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटप अंतिम झाल्याचे सांगितले असले तरी आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी त्यांची पोल-खोल केली. “काँग्रेस (Congress) आणि उबाठा (Shivsena UBT) यांच्यात जागावाटपावर एकमत नसून घमासान आहे. त्यांच्यात भांडण आहे तोवर आम्ही उपरे आहोत. त्यांचे भांडण मिटले की आमचा उपरेपणा संपेल,” असे आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केले.
आम्ही जेवण देत नाही
वंचित (Vanchit) आघाडी स्वतंत्र लढली, तर लोकसभेच्या ४८ पैकी  किमानसहा जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित (Vanchit) बहुजन आघाडीचे आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “आम्ही 42 मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सभेत आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. मात्र, तरीदेखील सभेला येणारा माणूस स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो.”
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.