National Dengue Day 2024: डेंग्यूची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या कसा टाळायचा हा आजार

डेंग्यू आजाराची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो.

91
National Dengue Day 2024: डेंग्यूची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या कसा टाळायचा हा आजार

डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. या आजरामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. डासांमुळे होणारे इतर आजार कमी होत असले तरी डेंग्यूचा धोका झपाट्याने वाढत आहे. उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही महिन्यात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागतात. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, अर्ध्याहून अधिक जगाला डेंग्यूचा धोका आहे. डेंग्यू हा व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार आहे पण, प्लेटलेट्स (Platelets) झपाट्याने कमी झाल्याने हा आजार अधिक गंभीर होऊ लागतो. याच कारणाने जर डेंग्यूवर वेळीच उपचार न केल्यास मृत्यूचा होण्याचा धोकाही असतो. या गंभीर आजराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस (16th may National Dengue Day 2024) साजरा केला जातो. याच निमित्ताने चला जाणून घेऊयात की डेंग्यूमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि डेंग्यू हा आजार कसा टाळता येईल ते आपण पाहुयात. (National Dengue Day 2024)

(हेही वाचा – Ambadas Danve : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी; अंबादास दानवेंचे पुन्हा आरोप)

डेंग्यू आजाराची लक्षणे:

डेंग्यूची लक्षणे : डास चावल्यानंतर साधारण ३-४ दिवसांनी शरीरावर लाल रंगाचे पुरळ दिसू लागतात. तसेक तीव्र ताप, (high fever) तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये दुखणे, स्नायू आणि हाडांमध्ये वेदना, उलट्या आणि मळमळ, हातावर सूज येणे अशी लक्षणे दिसू लागतात. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये १३ जागांसाठी चौरंगी मुकाबला)

जाणून घ्या कसा करायचा या आजारपासून बचाव:

फार झाडं असलेल्या ठिकाणी तसेच कमी साफसफाई असलेल्या ठिकाणी जाताना पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला. कधीही झोपताना मच्छरदाणी लावूनच झोपा, घराच्या दारे-खिडक्यांवर मच्छरदाणी बसवून घ्या, संध्याकाळच्या वेळी दारे खिडक्या शक्यतो बंद ठेवा, डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बाजरात उपलब्ध असलेल्या क्रीम किंवा स्प्रे लावा, डास अंडी घालू शकतील अशा जागा घरात असू नये याची काळजी घ्या. घराभोवती घाण आणि कचरा साचणार नाही यांची दक्षता घ्या. तसेच भरपूर पाणी प्या आणि लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. (National Dengue Day 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.