Ambadas Danve : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी; अंबादास दानवेंचे पुन्हा आरोप

Ambadas Danve : आरोप केल्यानंतर तपासणी झाल्याचे दाखवायचे. नेहमी मुख्यमंत्री जशी शो बाजी करतात, तशी शो बाजी त्यांनी केली आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे.

214
Ambadas Danve : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी; अंबादास दानवेंचे पुन्हा आरोप
Ambadas Danve : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी; अंबादास दानवेंचे पुन्हा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे पैशांनी भरलेल्या मोठमोठ्या बॅगा होत्या, असा गंभीर आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्यानंतर १६ मे, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आले असता ते हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या बॅगांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नाही, असा दावा करण्यात आला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : जाहिरात फलकाचा राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण!)

हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात

शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रोड शो आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आले असता ते हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरताच मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा दोन ते तीन बॅग होत्या. हेलिकॉप्टरमधून बॅगा काढत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीत ठेवण्यात आल्या. त्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

त्या दिवशी बॅगा का चेक केल्या नाहीत? – अंबादास दानवेंचा सवाल

याबाबत अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, त्या दिवशी बॅगा का चेक केल्या नाहीत? आता आरोप केल्यानंतर ते बॅगांमध्ये काही घेऊन जाणार आहेत का? ही फक्त नाटकबाजी आहे. त्या दिवशी बॅगा का नाही चेक केल्या याचे उत्तर तपासयंत्रणांनी द्यावे. मुख्यामंत्र्यांनी आणलेल्या बॅगा कुठे गेल्या, याची तपासणी करावी. आरोप केल्यानंतर तपासणी झाल्याचे दाखवायचे. नेहमी मुख्यमंत्री जशी शो बाजी करतात, तशी शो बाजी त्यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.