Qatar Court Sentence Death Penalty : सरकारच्या मुत्सद्देगिरीला यश; फाशीची शिक्षा झालेल्या 8 नौदल जवानांना मोठा दिलासा

Qatar Court Sentence Death Penalty : कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. कतारने अद्याप या सर्व माजी अधिकाऱ्यांविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिलेली नाही. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप आहे.

255
Qatar Court Sentence Death Penalty : सरकारच्या मुत्सद्देगिरीला यश; फाशीची शिक्षा झालेल्या 8 नौदल जवानांना मोठा दिलासा
Qatar Court Sentence Death Penalty : सरकारच्या मुत्सद्देगिरीला यश; फाशीची शिक्षा झालेल्या 8 नौदल जवानांना मोठा दिलासा

कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. या नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा ठपका ठेवून कतार कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. (Qatar Court Sentence Death Penalty)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा वेळी गर्भगृहात पाच जणांची उपस्थिती)

कतार (Qatar) कोर्टाच्या या निर्णयावर भारताने आश्चर्य व्यक्त केले होते. भारतीय नौदलाचे (Indian Navy) हे सर्व आठ माजी अधिकारी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून कतारमधील कारागृहात होते. कतारने अद्याप या सर्व माजी अधिकाऱ्यांविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिलेली नाही. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”आम्ही दाहरा ग्लोबल प्रकरणात (Dahra Global Affair) कतारच्या अपील न्यायालयाच्या आजच्या निकालाची नोंद घेतली आहे. ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. तपशीलवार निकालाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. पुढील निर्णय घेण्यासाठी आम्ही कायदेशीर टीम, तसेच नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहोत,” असे ते पुढे म्हणाले.

(हेही वाचा – Mumbai Trans Harbour Link : न्हावा-शेवा सागरी सेतूचे लवकरच होणार उद्घाटन; प्रवास होणार गतीमान)

”आमचे कतारमधील (Embassy of India, Doha) राजदूत आणि इतर अधिकारी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आज अपील न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच आम्ही नौदल अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत करत राहू. आम्ही हे प्रकरण कतारच्या अधिकार्‍यांकडेही मांडत राहू. या प्रकरणाच्या गोपनीय आणि संवेदनशील स्वरूपामुळे, या क्षणी आणखी कोणतीही टिप्पणी करणे योग्य होणार नाही”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (Qatar Court Sentence Death Penalty)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.