Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा वेळी गर्भगृहात पाच जणांची उपस्थिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ प्रमुख मोहन भागवत आणि मंदिराचे आचार्य (मुख्य पुजारी) गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत.

408
Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी?
Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी?

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि मंदिराचे आचार्य (मुख्य पुजारी) गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम पीएम मोदी भगवान श्रीरामांना (PM Narendra Modi) आरशात चेहरा दाखवतील. (Ayodhya Ram Mandir)

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाच्या (Ramlalla pranapratistha) २३ दिवस आधी ३० डिसेंबरला पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) अयोध्येत येत आहेत. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) श्रीराम विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील आणि रोड शो करणार आहेत. याआधी मंदिर ट्रस्ट रामलल्लाच्या तीन मूर्तींपैकी एकाची निवड करेल. २९ डिसेंबर रोजी मूर्तीची निवड होणार आहे. या रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. आज गुरुवारी (२८ डिसेंबर) आणि उद्या शुक्रवारी (२९ डिसेंबर) ट्रस्टची बैठक आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – Congress : नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्याकडून कॉंग्रेसची उपेक्षा)

ही असेल प्राणप्रतिष्ठेची एकूण वेळ

प्राणप्रतिष्ठा फक्त १ मिनिट २४ सेकंदात होईल. काशीच्या पंडितांनी हा शुभ मुहूर्त निश्चित केला आहे. द्रविड बंधू पं. गणेशेश्वर शास्त्री द्रविड आणि पं. विश्वेश्वर शास्त्री यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी मूळ मुहूर्त १२:२९ वाजून ८ सेकंदापासून सुरू होईल, जो १२:३०:३२ पर्यंत चालेल, म्हणजेच प्राणप्रतिष्ठेची एकूण वेळ असेल. १ मिनिट २४ सेकंद. (Ayodhya Ram Mandir)

या मुहूर्ताचे शुद्धीकरणही केले जाणार आहे. मुहूर्त शुध्दीची वेळ २० मिनिटे असेल. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार असून, ६:२० पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर २० जानेवारीला सूर्योदयापूर्वी मुहूर्तावर शुद्धीकरणाचा संकल्प होईल. पंडित गणेशवर शास्त्री यांनीच काशी कॉरिडॉरचे उद्घाटन आणि राम मंदिराच्या पायाभरणीसाठी वेळ निश्चित केली होती. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.