Mumbai Trans Harbour Link : न्हावा-शेवा सागरी सेतूचे लवकरच होणार उद्घाटन; प्रवास होणार गतीमान

Mumbai Trans Harbour Link : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

1792
Mumbai Trans Harbour Link : न्हावा-शेवा सागरी सेतूचे लवकरच होणार उद्घाटन; प्रवास होणार गतीमान
Mumbai Trans Harbour Link : न्हावा-शेवा सागरी सेतूचे लवकरच होणार उद्घाटन; प्रवास होणार गतीमान

नवी मुंबईकर अत्यंत वाट पहात असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) रोड येत्या नववर्षात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. 21.08 किलोमीटर लांबीच्या न्हावा-शेवा सागरी सेतूचे (Nhava-Sheva Sea Bridge) 12 जानेवारी रोजी लोकार्पण होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत उपस्थित रहाणार आहेत, असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi १२ जानेवारीपासून प्रचाराचा शुभारंभ करणार)

99 टक्के काम पूर्ण

अटलबिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक (Atal Bihari Vajpayee Trans Harbor Link) म्हणजेच शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) चे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. 25 डिसेंबर रोजी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार होते. मात्र पुलाचे थोडे काम बाकी असल्यामुळे लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र आता नवीन वर्षात पूल सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित रहाण्याची शक्यता आहे.

नववर्षात 12 जानेवारी रोजी ट्रान्स हार्बर लिंकच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे, यासाठी विनंती करण्यात आली आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा मुंबईकरांना असा होणार फायदा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वांत मोठा सागरी पूल आहे. या पुलामुळे मुंबई-नवी मुंबईतील अंतर 30 मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ, जेएनपीए (JNPA) बंदर, मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway), मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जोडला जाणार आहे. मुंबईहून पुण्याला पोहोचणेही सोप्पे होणार आहे. या पुलामुळे पेट्रोल-डिझेलचीही मोठी बचत होणार आहे.

येत्या 12 जानेवारीला नाशिक मध्ये राष्ट्रीय युवा संमेलनाचे (National Youth Conference Nashik) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार चालू करण्यात येणार आहे. याच दिवशी पंतप्रधान मोदी यांना मुंबईत येण्याची विनंती करण्यात येणार आहे. (Mumbai Trans Harbour Link)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.