City Concrete Road : शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी अखेर २ कंत्राटदार पुढे आलेत होSS

597
City Concrete Road : शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी अखेर २ कंत्राटदार पुढे आलेत होSS
City Concrete Road : शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी अखेर २ कंत्राटदार पुढे आलेत होSS
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईतील ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या विकासकामांसाठी सुमारे ६०८० कोटी रुपयांच्या कंत्राट कामांमध्ये शहर भागातील कामांसाठी अखेर कंत्राटदार पुढे आले आहेत.

रस्ते कंत्राट (City Concrete Road) कामांमधील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी वारंवार निविदा रद्द केल्यानंतरही आता या कामांसाठी दोन कंत्राटदारांनी सहभाग नोंदवला असून आता या रस्ते कामांच्या निविदा या लवकरच उघडल्या जाणार आहे. त्यामुळे या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी कंत्राटदाराची निवड झाल्यास येत्या ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत सध्या सुमारे ४०० रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामातील पहिल्या टप्प्यातील शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे यांच्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतर, शहर भागातील रस्ते कामांसाठी नेमलेल्या मेसर्स रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राट कंपनीने नियोजित वेळेत काम सुरू न केल्याने त्यांचे कंत्राट रद्द करून त्यांना ६४ कोटी रुपयांचा दंड आकारला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या या शहर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेने प्रथम फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथम १,३६२ कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. परंतु त्यामध्ये केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यातील एक कंपनीही स्वत: दंडात्मक कारवाई झालेली रोडवे सोल्यूशन ही कंपनी होती. त्यामुळे या निविदेत केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याने तसेच स्पर्धात्मक निविदा न झाल्याने महापालिका प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया रद्द करत नव्याने निविदा निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – Sunita Williams 3rd Mission: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित, अमेरिकेची अवकाश संस्था नासाने सांगितले कारण ? जाणून घ्या)

त्यानुसार नव्याने निविदा मागवण्यात आली. यासाठी महापालिका मुख्यालयात (BMC) या रस्ते कामा संदर्भात निविदा पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु याला एकही कंपनी उपस्थित राहिली नव्हती. एकही कंपनी न आल्याने अखेर ही बैठकच रद्द करण्यात आली आहे.

या कामासाठी यापूर्वी ज्या कंपनीवर कारवाई केली आहे, त्यांच्यावर ६४ कोटींचा दंड आकारला आहे, तो दंड कमी करण्यासाठी तसेच कारवाई थांबवण्यासाठी संबंधित कंपनीकडून न्यायालयात जोरदार लढा सुरु आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यांच्या निविदेत भाग घेतल्यास,भविष्यात न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या (BMC) विरोधता आल्यास त्यासाठी भरलेली अनामत रक्कम तसेच इतर काम अडकून पडेल याची भीती काही कंत्राटदारांना वाटत आहे. त्यामुळे काही कंपन्या कामासाठी पुढे येत नाही असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

(हेही वाचा – मुंबईत जाणीवपूर्वक मराठी-गुजराती वाद निर्माण केला जातोय; MNS चा आरोप)

मात्र, या पहिल्या टप्प्यातील शहर भागातील रस्ते कामांसाठी मागवलेल्या निविदेत आता दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र, या दोन कंपन्यांमध्ये दंडात्मक कारवाई केलेली रोडवेज ही कंपनी नाही. यापूर्वी या दंडात्मक केलेल्या कंपनीने निविदेत भाग घेतला होता. परंतु या कंपनीने निविदेसोबत भरलेली अनामत रक्कम जप्त केली आणि यापूर्वीच्या ६४ कोटी रुपयांच्या दंडात्मक वसुलीमध्ये वळती करण्यात आली. त्यामुळे या संबंधित कंपनीने या निविदेत भाग घेतला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या शहर भागातील या पहिल्या टप्प्यातील रस्ते कामांसाठी दोन कंपन्या आल्याने लवकरच ही निविदा उघडली जाईल आणि पात्र कंपनीची निवड केली जाईल असे बोलले जात आहे. (City Concrete Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.