Pune Local Railway Megablock : रविवारी पुणे-लोणावळा लोकलचा मेगब्लॉक, वाचा वेळापत्रक…

पुण्याहून लोणावळ्यासाठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील. 

251
Pune Megablock: रविवारी पुणे-लोणावळा लोकलचा मेगब्लॉक, वाचा वेळापत्रक...
Pune Megablock: रविवारी पुणे-लोणावळा लोकलचा मेगब्लॉक, वाचा वेळापत्रक...

पुणेकरांसाठी (Pune Local Railway Megablock) आणि लोकल प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे, पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजीनिअरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरिता उद्या रविवार, (४ फेब्रुवारी) मेगाब्लॉक (Local Megablock)  घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचा ट्रेनच्या वेळेबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

लोकल ट्रेनचा तपशील खालीलप्रमाणे 

अप उपनगरीय गाड्या रद्द  

1. पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.

2. पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.

3. शिवाजीनगरहून लोणावळा साठी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द राहील.

4. पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.

5. शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.

6. पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.

7. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

(हेही वाचा – Drugs : मुंबईत भिकाऱ्यामार्फत ड्रग्जची विक्री)

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द 

1. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.

2.लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द राहील.

3. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

4. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.

5. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.

6. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.

7. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

(हेही वाचा – LK Advani : स्वातंत्र्यानंतर राजकारणाला हिंदुत्वाची दिशा देणारा नेता)

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन 

गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शनमध्ये साडेतीन तास रेग्युलेट करण्यात येईल. वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक (Maintenance Mega Block) पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.