Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या द्विशतकानंतर यशस्वी सचिन, विनोद आणि रवी शास्त्रीच्या पंक्तीत

यशस्वी जयसवालचं भारतातील कसोटीतील हे पहिलं शतक होतं. 

211
Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या द्विशतकानंतर यशस्वी सचिन, विनोद आणि रवी शास्त्रीच्या पंक्तीत
  • ऋजुता लुकतुके

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयसवालने (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या कसोटीत केलेल्या शतकानंतर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि रवी शास्त्री या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत बसला आहे. २० कसोटींमधलं यशस्वी जयसवालचं (Yashasvi Jaiswal) हे दुसरं शतक आहे. बाकीचे भारतीय फलंदाज निराशा करत असताना यशस्वी (Yashasvi Jaiswal) मात्र दिवसभर खेळपट्टीवर उभा राहिला. आणि दुसऱ्या दिवशीही सकाळच्या सत्रात त्याने नैसर्गिक फलंदाजी सुरूच ठेवली. आपलं पहिलं वहिलं द्विशतकही पूर्ण केलं. २९० चेंडूंत २०९ धावा करताना त्याने ७ षटकार आणि १९ चौकार लगावले. (Ind vs Eng 2nd Test)

या द्विशतकानंतर यशस्वी जयसवालचं (Yashasvi Jaiswal) एक शतक परदेशात तर एक भारतीय खेळपट्टीवर झालं आहे. आणि २३ वं वर्ष पूर्ण करण्यापूर्वी परदेशात आणि देशात शतक झळकवणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या आधीचे तीन फलंदाज आहेत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि रवी शास्त्री. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Drugs : मुंबईत भिकाऱ्यामार्फत ड्रग्जची विक्री)

इतक्या वर्षांनी आली कसोटीत द्विशतक करण्याची वेळ

इतकंच नाही तर लहान वयात द्विशतक पूर्ण करण्याच्या बाबतीत आता तो भारतीय फलंदाजांत तिसरा आहे. २२ व्या वर्षी यशस्वीने (Yashasvi Jaiswal) द्विशतक झळकावलं आहे. तर भारतातर्फे सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी २१ व्या वर्षीच पहिलं द्विशतक झळकावलं होतं. तर डावखुऱ्या फलंदाजाने कसोटीत द्विशतक करण्याची वेळ तब्बल १५ वर्षांनी आली आहे. यापूर्वी २००८ मध्ये भारताच्या गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०६ धावा केल्या होत्या. (Ind vs Eng 2nd Test)

इतकंच नाही तर कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांच्या यादीत आता यशस्वी पाचवा आहे. यशस्वी विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी १७७ धावांवर नाबाद होता. यापूर्वी विरेंद्र सेहवागने पहिल्याच दिवशी २०५ आणि १९५ धावा केल्या आहेत. त्यानंतर वसिम जाफरने २००८ मध्ये पाकिस्तान विरुद्घ कोलकाता इथं १९२ धावा केल्या होत्या. तर शिखर धवन १९० धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.