वयाच्या ९५व्या वर्षांपर्यंत शिखांना मार्गदर्शन केलेले Guru Amar Das

81

गुरु अमर दास (Guru Amar Das) हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी तिसरे गुरु होते. एकदा त्यांनी त्यांच्या पुतण्याच्या पत्नीकडून गुरु नानक यांचे एक स्तोत्र ऐकले आणि ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर ते आपल्या गुरूंच्या शोधात बाहेर पडले. त्यांच्या पुतण्याच्या पत्नीचं नाव बीबी अमरो असं होतं. बीबी अमरो या त्या काळाचे शिखांचे दुसरे गुरु अंगद यांच्या कन्या होत्या. बीबी अमरो यांनी अमर दास यांची ओळख गुरु अंगद यांच्याशी करून दिली. १५३९ साली गुरु अमर दास यांची गुरु अंगद यांच्याशी ओळख झाली. त्यांनी गुरु अंगद यांचं शिष्यत्व स्वीकारून स्वतःला त्यांच्याकडे समर्पित केलं. त्यावेळी गुरु अमर दास (Guru Amar Das) हे साठ वर्षांचे होते. त्यानंतर १५५२ साली गुरु अंगद यांनी त्यांचे देहावसान होण्यापूर्वी गुरु अमर दास यांना शिखांचे तिसरे गुरु म्हणून घोषित केले.

(हेही वाचा Terrorist Attack: पुंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, हवाई दलाचा जवान हुतात्मा, ४ जखमी)

गुरु अमर दास यांचे लिखाण संग्रहित करून आदीग्रंथ तयार केला 

गुरु अमर दास (Guru Amar Das) हे शिखांच्या गुरु परंपरेतले महत्त्वाचे गुरु ठरले. त्यांनी प्रशिक्षित पालकांची नेमणूक करून ‘मंजी प्रणाली’ नावाची धार्मिक संस्था सुरू केली. या संस्थेचा पुढे विस्तार झाला आणि ती टिकुनही राहिली. गुरु अमर दास यांनी स्तोत्रेही लिहिली, पोथ्या लिहिल्या. पुढे त्यांचे लिखाण संग्रहित करून आदीग्रंथ तयार करण्यात आला. वयाच्या ९५व्या वर्षांपर्यंत गुरु अमर दास हे शिखांचे गुरु म्हणून शिखांना मार्गदर्शन करत राहिले. त्यानंतर त्यांनी आपले जावई भाई जेठा यांना शिखांचे पुढचे गुरु घोषित केले. पुढे ते गुरु राम दास या नावाने ओळखले जाऊ लागले. गुरु अमर दास हे १५७४ साली गोइंदवाल साहेब या ठिकाणाहून अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले. इतर शीख गुरूंप्रमाणेच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अस्थि हरीसार येथे विसर्जित करण्यात आल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.