Mumbai Metro: आरे-वरळीदरम्यान मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात, एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

आरे-कुलाबादरम्यानचे भुयारीकरण आणि रुळांचे काम याआधीच पूर्ण झाले आहे, तर वरळीपर्यंत सिग्नलसह इतर यंत्रणांची कामेही पूर्ण झाली आहेत.

103
Mumbai Metro: जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मेपर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ या प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला येत्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. सध्या आरे-बीकेसीदरम्यान मेट्रो गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत, पण आता आरे ते वरळीपर्यंत मेट्रो गाड्यांच्या चाचणी फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. रुळ, इतर यंत्रणेची चाचणी करण्यासाठी मेट्रो गाडी वरळीपर्यंत नेण्यात येणार आहे. (Mumbai Metro)

मेट्रो ३ ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. ३३.५ किमी लांबीच्या या मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. लवकरच आरे-बीकेसी असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका असल्याने ‘एमएमआरसी’ कडून (Mumbai Metro Rail Corporation (MMRC)) अत्यंत काळजीपूर्वक चाचणी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Mumbai Metro)

(हेही वाचा – वयाच्या ९५व्या वर्षांपर्यंत शिखांना मार्गदर्शन केलेले Guru Amar Das)

आरे-बीकेसीदरम्यान पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने आतापर्यंत आरे-बीकेसी अशी मेट्रो गाडी चालविली जात आहे. गाडी, रूळ आणि इतर यंत्रणेच्या चाचण्या करण्याचे काम सुरू आहे, आता मात्र या आठवड्यापासून आरे-वरळीदरम्यान मेट्रो गाडी चालवून चाचण्या करणार असल्याची माहिती ‘एमएमआरसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दुसरा टप्पा काही महिन्यांत वाहतूक सेवेत दाखल…
आरे-कुलाबादरम्यानचे भुयारीकरण आणि रुळांचे काम याआधीच पूर्ण झाले आहे, तर वरळीपर्यंत सिग्नलसह इतर यंत्रणांची कामेही पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे बीकेसी-वरळी असा दुसरा टप्पा येत्या काही महिन्यांत एमएमआरसीला वाहतूक सेवेत दाखल करायचा आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी आता थेट वरळीपर्यंत मेट्रो गाडी नेण्यात येणार आहे तसेच येत्या ४-५ दिवसांत प्रथमच आरे-वरळी अशी मेट्रो गाडी धावणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.