Prime Minister Modi : देशातील सर्वात लांब बोगदा वाहतुकीसाठी खुला

195
Gayatri Parivar: गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञात पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित
Gayatri Parivar: गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञात पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित

देशातील सर्वांत लांब मालवाहतुकीसाठीचा बोगदा आज, मंगळवारी अखेर खुला झाला(Prime Minister Modi). उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Modi) यांनीच मंगळवारी या गाडीला हिरवा कंदील दर्शविला.

(हेही वाचा- Jammu and Kashmir : पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले 32,000 कोटींच्या विकासप्रकल्पांचे उद्‌घाटन )

पंतप्रधान मोदींनी(Prime Minister Modi) एकाच वेळी विजेवर 2 धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.यातील एक गाडी ही श्रीनगर ते सांगल्दान आणि दुसरी सांगल्दान ते श्रीनगर दरम्यान धावल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधानांच्या(Prime Minister Modi) हस्ते 48.1 किलोमीटर लांबीच्या बनिहाल- खेरी- सुंबेर- सांगल्दान या विभागाचेही उद्घाटनही करण्यात आले.या बोगद्याची लांबी 12,77 किलोमीटर एवढी असून तो ‘टी-50’ या नावानेही ओळखला जातो. हा बोगदा खरी- सुंबेर सेक्शनचाच भाग आहे. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे आता बारामुल्ला ते सांगल्दानदरम्यान रेल्वे धावू शकेल. ही गाडी बनिहाल मार्गे धावणार आहे.बनिहाल- खेरी- सुंबेर- सांगदाल विभागामध्ये अकरा बोगद्यांची उभारणी करण्यात आली असून त्यातील ‘टी-50’ या बोगद्याच्या निर्मितीचे काम खूप आव्हानात्मक होते. या बोगद्याचे काम हे साधारणपणे 2010 मध्ये सुरू झाले त्यानंतर हा बोगदा पूर्ण व्हायला 14 वर्षांचा अवधी लागला.आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ‘टी-50’ या मुख्य बोगद्यालाच समांतर असा एक बोगदा तयार करण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्यातून स्वतःची सुटका करून घेता येईल.(Prime Minister Modi)

या बोगद्यामध्ये अचानक एखाद्या वाहनाला आग लागली तर ती विझविता यावी म्हणून दोन्ही बाजूला पाण्याचे पाइप बसविण्यात आले आहेत. या पाईपला 375 मीटरच्या अंतराने वेगळ्या व्हॉल्वची सोय करण्यात आली असून त्यातून आगीवर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करण्यात येईल. सध्या बारामुल्ला ते बनिहालदरम्यान विजेवरील 8 गाड्या धावतात त्यातील 4 गाड्यांचा टप्पा हा सांगल्दानपर्यंत वाढविण्यात आला आहे.(Prime Minister Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.