Trinamool Congress : बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याकडून महिलांचा छळ; न्यायालयाने सरकारला फटकारले

142
Trinamool Congress : बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याकडून महिलांचा छळ; न्यायालयाने सरकारला फटकारले
Trinamool Congress : बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्याकडून महिलांचा छळ; न्यायालयाने सरकारला फटकारले

हे स्पष्ट झाले आहे की, शाहजहानने लोकांचे नुकसान केले आहे(Trinamool Congress) आणि आरोप झाल्यानंतर तो फरार आहे. तो पोलिसांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येत आहे. समस्येच्या मुळाशी असलेला माणूस अद्याप पकडला गेला नाही आणि तो फरार आहे, हे धक्कादायक आहे. त्याच्यावर हजारो खोटे आरोप आहेत, पण त्यातला एकही खरा असेल, तर त्याची चौकशी करावी. तुम्ही लोकांना विनाकारण त्रास देत आहात, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपिठाने म्हटले बंगाल सरकारला फटकारले आहे.(Trinamool Congress)

(हेही वाचा- पंतप्रधान सूर्योदय योजना )

संदेशखाली येथे स्थानिकांवर अत्याचार होत असल्याच्या प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटीमार्फत चौकशी व्हावी,(Trinamool Congress) अशी याचिका न्यायालयाने फेटाळली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाकडूनही निर्णय दिला जाणार आहे.(Trinamool Congress)

काय आहे प्रकरण

संदेशखाली परिसरात गेल्या 10 दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. येथे तृणमूल कॉंग्रेसचे(Trinamool Congress) नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या समर्थकांवर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. ‘शेख शाहजहान ज्याला पाहिजे, त्याला आपल्या वासनेचा शिकार बनवायचा’, असे महिलांचे म्हणणे आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या छाप्यानंतर शाहजहान फरार आहे. शेखवर ईडीच्या टीमवर हल्ला केल्याचाही आरोप आहे.(Trinamool Congress)

या प्रकरणी आतापर्यंत TMC नेते शिब प्रसाद हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यासह एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

बंगाल बनला महिलांच्या छळाचा अड्डा – स्थानिक महिलांचे ममता बॅनर्जींवर आरोप

संदेशखाली येथील महिला ममता(Mamata Banerjee) यांचा उघड निषेध करत आहेत. एका महिलेने सांगितले की, येथे रहाणे अत्यंत धोकादायक बनले आहे. उत्तम सरदार आणि शिब प्रसाद हाजरा यांना अटक करण्यात आली असली,(Trinamool Congress) तरी त्यांना शिक्षा झालेली नाही. या दोघांसह शाहजहान शेखलाही शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला सन्मानाने जगायचे आहे. आमची मुख्यमंत्री महिला आहे; पण त्यांना आमची वेदना समजत नाही. त्याने इथे येऊन आमच्याशी बोलावे. तिने आमच्या बाजूने आवाज उठवला पाहिजे, पण ज्यांनी हल्ला केला, त्यांच्यासाठी ती आवाज उठवत आहे.(Trinamool Congress)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.